अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणार ७.५ लाखापर्यंत कर्ज, असा करा अर्ज  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 08:56 AM2022-07-25T08:56:51+5:302022-07-25T08:58:13+5:30

इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमिया शेख यांनी केले आहे.

Minority students will get a loan of up to 7.5 lakh, such application can be made | अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणार ७.५ लाखापर्यंत कर्ज, असा करा अर्ज  

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणार ७.५ लाखापर्यंत कर्ज, असा करा अर्ज  

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारशी व ज्यू या समाजातील व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाने ७ लाख ५० हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्जाची योजना सुरु केली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमिया शेख यांनी केले आहे.

 असा करता येईल अर्ज  
योजनेच्या लाभासाठी malms.maharashtra.gov.in या लिंकवर अर्ज करावा. महामंडळाच्या https://mamfdc.maharashtra.gov.in येथे जिल्हास्तरीय 
कार्यालयांची तसेच योजनेची 
माहिती उपलब्ध असून या संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्जही करता येईल. राज्यस्तरावर महामंडळाच्या ओल्ड कस्टम हाऊस, फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात 
संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Minority students will get a loan of up to 7.5 lakh, such application can be made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.