Join us  

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणार ७.५ लाखापर्यंत कर्ज, असा करा अर्ज  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 8:56 AM

इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमिया शेख यांनी केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारशी व ज्यू या समाजातील व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाने ७ लाख ५० हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्जाची योजना सुरु केली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमिया शेख यांनी केले आहे.

 असा करता येईल अर्ज  योजनेच्या लाभासाठी malms.maharashtra.gov.in या लिंकवर अर्ज करावा. महामंडळाच्या https://mamfdc.maharashtra.gov.in येथे जिल्हास्तरीय कार्यालयांची तसेच योजनेची माहिती उपलब्ध असून या संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्जही करता येईल. राज्यस्तरावर महामंडळाच्या ओल्ड कस्टम हाऊस, फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :शिष्यवृत्तीविद्यार्थी