मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात २१ उमेदवार रिंगणात आहेत; मात्र मुख्य लढत उद्धवसेनेचे अमोल कीर्तिकर आणि शिंदेसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांच्यात होत आहे. दोघांच्याही प्रचारात रंगत वाढत असून, ‘ईडी’चे आरोप असलेल्या या उमेदवारांपैकी कोणाच्या पदरात या मतदारसंघातील सुमारे ३ लाख ४० हजार अल्पसंख्याक मतदार मतांचे दान टाकतात, हे पाहावे लागणार आहे.
मुंबई उत्तर पश्चिमेतील मावळते खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याने उद्धवसेनेने त्यांचे पुत्र अमोल यांना उमेदवारी दिली. तर, दुसरीकडे वायकर यांनी मागील ३५ वर्षांत चारवेळा नगरसेवकपद आणि तीनवेळा आमदारकी भूषवली आहे.
लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना दांडगा अनुभव आहे. ईडीच्या त्रासाला कंटाळून त्यांनी १० मार्चला शिंदेसेनेत प्रवेश केला. शिंदेसेनेने त्यांना रिंगणात उतरवले आहे. अमोल यांच्या प्रचारासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी रोड शो केला. यावेळी त्यांनी वायकर यांच्या जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शक्तिप्रदर्शन केले. गोरेगावात सभा घेतली. कीर्तिकर यांनी मतदारसंघ पिंजून काढताना घरोघरी आपली निशाणी पोहोचवण्यावर भर दिला. त्यांच्या प्रचारात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, आप आणि इतर पक्ष सक्रिय आहेत. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वायकर यांच्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. गोरेगाव पूर्वेत त्यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा, नागरी निवारा येथे महायुतीचा मेळावा घेतला. जोगेश्वरी व अंधेरी पूर्वमध्ये शक्तिप्रदर्शन करत रोड शो केला.
गाजत असलेले मुद्दे
दिवसेंदिवस वाढती वाहतूककोंडी.‘आरे’च्या वनजमिनीवरील रहिवाशांच्या पुनर्विकासाचा प्रश्न.वर्सोवा कोळीवाड्याचे पुनर्वसनवर्सोवा-लोखंडवाला परिसरात कायमचे टपाल कार्यालयरखडलेल्या जुन्या इमारती व झोपडपट्ट्यांचा पुनर्विकासलोखंडवाला संकुल, सात बंगला, यारी रोड येथील अग्निशमन दलाची उभारणी
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
या लोकसभा मतदारसंघात वायकर यांच्यासह महायुतीचे चार आमदार असतानाही त्यांना उद्धवसेनेचे आव्हान आहे. आजवर सुमारे तीन लाख ३४ हजार अल्पसंख्याक मतदारांनी कायमच काँग्रेसलाच हात दिला आहे. उत्तर भारतीयांची सुमारे तीन लाख ६० हजार मते महाविकास आघाडी आणि महायुतीत वाटली गेली आहेत. मराठी मतदार सहा लाख आहेत.
२०१९ मध्ये काय घडले ?
उमेदवार पक्ष प्राप्त मतेगजानन कीर्तिकर शिवसेना ५,७०,०६३संजय निरुपम काँग्रेस ३,०९,७३५सुरेश शेट्टी वंचित २३,३६७
२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी ?
वर्ष विजयी उमेदवार पक्ष मते टक्के२०१४ गजानन कीर्तिकर शिवसेना ४,६४,८२० ५१.७७२००९ गुरुदास कामत काँग्रेस २,१५,५३३ ३५.५२००४ सुनील दत्त काँग्रेस ३,८५,७५५ ५१.५९१९९९ सुनील दत्त काँग्रेस ३,६६,६६९ ५२.३५