मिनीट्रेनची जुम्मापट्टीपर्यंत चाचणी यशस्वी
By admin | Published: April 30, 2017 03:07 AM2017-04-30T03:07:41+5:302017-04-30T03:07:41+5:30
मिनीट्रेनचे डबे ९ मे २०१६ रोजी रु ळावरून घसरल्यानंतर अनिश्चित काळासाठी मिनीट्रेन बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर सुरू केलेले नादुरु स्त रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीचे
माथेरान (रायगड) : मिनीट्रेनचे डबे ९ मे २०१६ रोजी रु ळावरून घसरल्यानंतर अनिश्चित काळासाठी मिनीट्रेन बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर सुरू केलेले नादुरु स्त रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी जुम्मापट्टीपर्यंत मिनीट्रेनची यशस्वी चाचणी घेण्यात आली. रेल्वेच्या मुंबई विभागीय व्यवस्थापकांनी, नेरळ-माथेरान मिनीट्रेन ३१ मेपूर्वी सुरू करण्याचे जाहीर केले आहे.
माथेरानची राणी अशी ओळख असणारी मिनीट्रेन ९ मे २०१६ पासून बंद आहे. ही ट्रेन सुरू होण्यासाठी नेरळपासून पुढे घाट मार्गावर ८ किलोमीटर अंतरावरील नॅरोगेज ट्रॅक दुरुस्तीचे काम सुरू आहे. ते काम कितपत यशस्वी झाले आहे, याची माहिती घेण्यास २८ एप्रिल रोजी मिनीट्रेनची नेरळ ते जुम्मापट्टी अशी चाचणी घेण्यात आली. (वार्ताहर)
- एनडीएम१-४०२ हे इंजिन चाचणी गाडीसाठी लावण्यात आले होते. तर मिनीट्रेनला सहा प्रवासी डबे जोडण्यात आले होते. नेरळ-जुम्मापट्टी हे ६.५ किलोमीटर अंतर ४५ मिनिटांत पूर्ण केले. जुम्मापट्टी येथून ही मिनीट्रेन पुन्हा नेरळ रेल्वे स्थानकात पोहोचली. या वेळी रेल्वेच्या अभियंत्यांची पूर्ण टीम उपस्थित होती.