ठाणो : ठाणो परिवहन सेवेचा गाडा सुधारण्याऐवजी आणखी खोलात रुतत चालला आहे. लोकमान्यनगर ते मीरा रोड या मार्गावर धावणा:या खाजगी ठेकेदाराच्या 25 बसेसचे आयुर्मान संपल्याने सोमवारपासून अखेर या मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली़ यामुळे रोज या मार्गावर प्रवास करणा:या सुमारे 12 हजार प्रवाशांना आता इतर सेवांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.
ठाणो परिवहन सेवेची सुरुवात झाल्यानंतर परिवहनमार्फत प्रथमच खाजगी ठेकेदारामार्फत 2क्क्6 मध्ये लोकमान्यनगर ते मीरा रोड असा लांब पल्ल्याचा मार्ग सुरू करण्यात आला. या बसेसवर चालक हे ठेकेदाराचे आणि वाहक परिवहनचे नेमण्यात आले होते. 25 बसेसच्या माध्यमातून ही सेवा सुरू झाली होती. अल्पावधीतच या बसेस प्रवाशांनी गच्च भरू लागल्या आणि परिवहनच्या उत्पन्नातसुद्धा यामुळे भर पडून लागली. पाच वर्षाचा करार या ठेकेदाराबरोबर करण्यात आला होता. पाच वर्षाचा करार संपल्यानंतर ठेकेदाराला तीन वेळा मुदतवाढ दिली़ विशेष म्हणजे या बसपैकी काही बसेसचे आयुर्मान संपले असतानादेखील त्या रस्त्यावर धावत होत्या. त्यातही, मागील वर्षी ठेकेदाराची देणी देणो परिवहनला शक्य न झाल्याने त्याने असहकार पुकारला होता. परंतु, त्याची मनधरणी करण्यात आली. मागील सहा महिन्यांपासून उर्वरित बसेसचा कालावधीदेखील संपुष्टात आल्याने रस्त्यावर त्यांची संख्या रोडावली. 25 वरून 1क् आणि मागील महिन्यात हीच संख्या दोन ते तीनवर आली होती.
या बसेसचे आयुर्मान संपुष्टात आल्याने आता त्यांचे सोमवारपासून धावणो बंद झाल्याचे परिवहनने जाहीर केले आहे. परंतु, अचानक बससेवा बंद झाल्याने या मार्गावरून प्रवास करणा:या सुमारे 12 हजार प्रवाशांना याचा नाहक फटका बसला आहे. प्रत्यक्षात परिवहनच्या ढिलाईमुळेच प्रवाशांवर ही वेळ आल्याची बाब आता उघड झाली आहे. विशेष म्हणजे याची कोणतीही पूर्वसूचना न देता हा महत्त्वाचा मार्ग बंद झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. या बसपोटी परिवहनला रॉयल्टीच्या स्वरूपात उत्पन्न मिळत होते. या मार्गावर रोज सुमारे 5क् ते 6क् हजारांचे उत्पन्न मिळत होते. परंतु, आता प्रवाशांबरोबर परिवहनला या मार्गावरील उत्पन्नाला मुकावे लागले आहे.
च्सध्या जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांची देणी अद्याप ठेकेदाराला देण्यात आलेली नाहीत. त्यात, आता परिवहन या मार्गावर मार्को पोलो बसेस सुरू करणार आहे.
च्सुरुवातीला पाच ते सहा बसेस या मार्गावर देण्याचे प्रयत्न असल्याची माहिती व्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी दिली. परंतु, यासाठी आणखी 1क् ते 2क् दिवसांचा कालावधी जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
च्परिवहनकडून ठाणो पूर्वेकडून ठाणो स्टेशन ते मीरा रोड अशी 58 नंबरची बस धावत आहे. परंतु, पाच बस या मार्गावर असून त्यासुद्धा वेळेत धावत नाहीत. त्यामुळे येथील प्रवाशांनाही इतर मार्गावर अवलंबून राहावे लागत आहे.
या मार्गावर पर्याय देण्यासाठी परिवहनच्या ताफ्यातच नव्या बस नसल्याने या मार्गाचे भवितव्य अधांतरी आले आहे. यासंदर्भात परिवहनकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता या मार्गावर बसेस सुरू करण्यासंदर्भात अनास्था दाखवली. बस उपलब्ध झाल्यानंतरच सुरू करण्या बाबत निर्णय घेण्याचे परिवहनने स्पष्ट केले.
च्संबंधित ठेकेदाराने यातील काही बस दुरुस्त करून देण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु, त्या केव्हा दुरुस्त होतील, याबाबत परिवहन प्रशासन साशंक आहे. 25 वरून बसेसची संख्या 1क् र्पयत होणार असल्याने पूर्वीच्या ठरावानुसार पेनल्टी लावू नये, अशीही मागणी त्याने परिवहनकडे केली आहे.
च्परिवहनचा एक मार्ग बंद झाला असताना दुसरीकडे मागील 1क्
वर्षे ठाणो स्थानकात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करणा:या नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेने सोमवारपासून वाशी रेल्वे स्थानक ते बोरिवली व्हाया ठाणो स्टेशन पूर्व अशी एसी बससेवा सुरू केली आहे.
च्सकाळी 6 वा. पहिली फेरी आणि शेवटची 8.1क् वाजता अशी ही वाशीहून बस सुटणार आहे. बोरिवलीवरून सकाळी 7 वा. आणि रात्री 11.क्5 वाजता शेवटची बस सुटणार आहे. 14 बसेस या मार्गावर धावणार असून रोज 35 फे:या होणार आहेत.