मिरे ॲसेट फाउंडेशनतर्फे होणार १५ हजार जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:06 AM2021-06-23T04:06:16+5:302021-06-23T04:06:16+5:30
मुंबई : कोरोनाच्या महामारीविरुद्ध लढण्यासाठी मिरे ॲसेट फाउंडेशनने १५ हजार मुंबईकरांचे मोफत लसीकरण करण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. ...
मुंबई : कोरोनाच्या महामारीविरुद्ध लढण्यासाठी मिरे ॲसेट फाउंडेशनने १५ हजार मुंबईकरांचे मोफत लसीकरण करण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. लसीकरणासाठी मिरे फाउंडेशनने वांद्रे येथील होली फॅमिली रुग्णालय तसेच नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे सहकार्य घेतले आहे. नानावटी रुग्णालयाचे लसीकरण हे विलेपार्ले पश्चिम येथील जमनाबाई नरसी स्कूलमध्ये केले जाणार आहे.
मोफत लसीकरणामुळे मुंबईतील लसीकरणाचा वेग वाढण्यास मदत होणार आहे.
मिरे ॲसेट फाउंडेशनचे संचालक रितेश पटेल यांनी सांगितले की, एक जबाबदार कॉर्पोरेट घटक या नात्याने मिरे ॲसेट आपले कर्तव्य बजावत आहे. लसीकरणास येत असलेल्या आव्हानांचा विचार करीत या मोहिमेसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. अनलॉकच्या प्रक्रियेत लसीकरणाने वेग घेतल्यास कोरोना विरुद्धच्या लढाईत महत्त्वाची भूमिका प्राप्त होईल.