दुचाकीवरील आरसा केवळ केस विंचरण्यापुरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:05 AM2020-12-27T04:05:37+5:302020-12-27T04:05:37+5:30

मुंबई : दुचाकी वाहनांना दोन बाजूंना लावण्यात येणारे आरसे हे वाहतुकीच्या नियमांच्या दृष्टिकोनातून लावले जातात. शिवाय चालकाला मागून ...

The mirror on the bike is just for hair washing | दुचाकीवरील आरसा केवळ केस विंचरण्यापुरता

दुचाकीवरील आरसा केवळ केस विंचरण्यापुरता

Next

मुंबई : दुचाकी वाहनांना दोन बाजूंना लावण्यात येणारे आरसे हे वाहतुकीच्या नियमांच्या दृष्टिकोनातून लावले जातात. शिवाय चालकाला मागून कोणते वाहन येत आहे हे पाहण्यासाठीदेखील आवश्यक असतो. त्यामुळे अपघात टाळता येऊ शकतो, मात्र या आरशांचा उपयोग केवळ २० टक्केच केला जात असल्याचा अंदाज आहे. आरशांचा उपयोग दुचाकीचा शो वाढविण्यासाठी किंवा केस विंचरण्यासाठीच होतो की काय, असा प्रश्न उपस्थित होतो.

स्पोर्ट बाइक आणि जास्त सीसीच्या वाहनांचे तर आरसे काढून त्या ठिकाणी शोच्या वस्तू लावल्या जातात. दोन्ही बाजूंचे आरसे नसल्यास वाहतूक पोलिसांना दंड आकारण्याचीदेखील मुभा आहे. त्यासाठी किमान २०० रुपये दंड आकारला जातो. आरसा असल्यास चालकाला मागे वळून पाहण्याची गरज नसते. हेल्मेट घातले असल्यास मागे वळून पाहण्यासाठी त्रासदायक ठरते. अशा वेळी जर आरसा असल्यास मागील येणारे वाहन त्यातून सहज दिसून जाते. शिवाय दुचाकी वळविताना हे आरसे फार उपयोगी पडतात. दुचाकी अपघातात वळणावर जास्त अपघात होतात. अनेक दुचाकी चालक दुचाकीला आरसा नसल्याने एक हात वळण्यासाठी दाखवतात. मात्र काही वेळा त्यांचे वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात होतो. दुचाकी चालकांवर गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणावर कारवाई झालेल्या आहेत. त्यात लायसन्स नसणे, हेल्मेट नसणे, आरसा नसणे, आरसी बूक व विमा नसणे अशा प्रकारच्या आणि तीन सीटच्या कारवाया झालेल्या आहेत.

शहरातील दुचाकी ८०००००

आरसा नाही म्हणून २०० रु. दंड

दुचाकीला आरसा नसल्यास वाहतूक पोलीस २०० रुपयांचा दंड आकारू शकतात. किमान एक साइड ग्लास दुचाकीला असणे आवश्यक आहे. दोन्ही असल्यास चांगले. शिवाय फॅशनेबल ग्लासदेखील लावता येऊ शकत नाहीत.

दुचाकीचालकांजवळ हे असणे बंधनकारक

दुचाकीचालकांकडे हेल्मेट आणि लायसन्स असणे सक्तीचे आहे. याशिवाय साइड ग्लास, आरसी बूक, इन्शुरन्स कागदपत्रे आवश्यक आहेत. योग्य नंबर प्लेट असणेदेखील बंधनकारक आहेत.

कोणत्याही वाहनासाठी आरसा आवश्यक आहे. त्यामुळे दुचाकीलादेखील आरसा लावण्याची सक्ती आहे. त्यामुळे अपघात टाळता येऊ शकतो. दुचाकीचालकाची सुरक्षा होते. आरसा न लावणाऱ्या दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते

- प्रवीण पडवळ, अतिरिक्त पोलीस आयुक्त

Web Title: The mirror on the bike is just for hair washing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.