‘विकासकांच्या मनातील रेराविषयीचे गैरसमज दूर होतील’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 06:06 AM2017-11-20T06:06:11+5:302017-11-20T06:07:11+5:30
मुंबई : रेरामध्ये ‘प्री रेरा’ आणि ‘पोस्ट रेरा’ असे दोन प्रकार असतील. यात विकासकांच्या मनातील रेराविषयीचे गैरसमज दूर होतील, असे प्रतिपादन गृहनिर्माण आणि नगरविकास केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीपसिंग पुरी यांनी केले.

महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने गृहनिर्माण विषयावर घाटकोपर पूर्वेकडील भाटिया वाडी सभागृहात, शनिवारसह रविवारी पाचव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हरदीपसिंग पुरी बोलत होते.
या प्रसंगी राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांच्यासह ज्येष्ठ वास्तुविशारद रमेश प्रभू उपस्थित होते, शिवाय निवारी कल्याण परिषदेचे अध्यक्ष द. म. सुखटणकर, परिषदेचे उपाध्यक्ष शरद कुमार, समन्वयक कर्नल तेजेंद्र पाल त्यागी आदी मान्यवर उपस्थित होते. मुंबई, दिल्ली, हैदराबाद, विशाखापट्टणम, चेन्नई, बंगळुरू, त्रिवेंद्रम या राज्यांतील प्रतिनिधींनी परिषदेला उपस्थिती दर्शविली. रमेश प्रभू या वेळी म्हणाले की, जीएसटी कर हाउसिंग सोसायटीला लागू करण्यात आला आहे. यामध्ये गृहनिर्माण संस्थांना मुभा द्यावी, पुनर्विकासासाठी मदत मिळावी, स्वयंविकासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, सोसायट्यांच्या तक्रारी सोडविण्यात याव्यात.