Join us

मुंबादेवीमध्ये मिस फायरिंगमुळे खळबळ; एक जण जखमी

By मनीषा म्हात्रे | Published: September 24, 2022 9:33 PM

मुंबादेवीमध्ये ज्वेलर्सच्या दुकानाबाहेर झालेल्या मिस फायरिंगमुळे एकच खळबळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबादेवीमध्ये ज्वेलर्सच्या दुकानाबाहेर झालेल्या मिस फायरिंगमुळे शुक्रवारी एकच खळबळ उडाली. यामध्ये एक कर्मचारी जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी एलटी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.

ठाणे येथील रहिवासी असलेले पोलीस उपनिरीक्षक शिवाजी पाटील (३७) यांच्या फिर्यादीवरून पोलीस अधिक तपास करत आहे. २३ सप्टेंबर रोजी  मुंबादेवी मंदीराजवळ शेख मेमन स्ट्रीट येथील जे.एम.सी. हाउस या बिल्डींगच्या  ५ व्या  माळयावर अंजा ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबारची घटना घडली. अंजा ज्वेलर्स प्रा.लि. चे मालक जिग्नेष पेठ यांचकडे केलेल्या चौकशीत त्यांचेकडील किंमती मुद्देमाल अन्य  ठिकाणी घेवुन जाण्याकरीता सिक्वेल लाजीस्टीक या सिक्युरिटी कंपनीचे दोन कर्मचारी भाडेतत्वार घेतलेले होते. त्यापैकी एका कर्मचा-याकडे असलेल्या सिंगल बोअर बंदुकीतून फायर झाला असुन त्यामुळे तो कर्मचारी स्वत:च जखमी झाला असल्याचे सांगितले. रईज अहमद सैफ दिन (३०) असे कामगारांचे नाव असून त्याच्यावर बॉमबे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.

रईज हा अंजा ज्वेलर्सचे किंमती साहीत्य घेवुन जाण्याकरीता आला होता.  तो  जिन्यावर बसलेला असताना सायंकाळी  पावणे आठच्या सुमारास त्याच्या जवळील सिंगल बोअर, बंदुकीतून अचानक फायर झाला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. रईजने निष्काळजीपणे बंदूक हाताळल्यामुळे तो जखमी झाल्याचे समोर आले. याप्रकरणी एलटी मार्ग पोलिसांनी त्याच्याच विरोधात गुन्हा नोंदवत पोलीस अधिक तपास करत आहे.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई