लालबाग राजाच्या विसर्जनावेळी बुडालेल्या बोटीतील मुलाचा मृतदेह सापडला!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 02:24 PM2018-09-29T14:24:51+5:302018-09-29T14:32:19+5:30

त्यानंतर सलग ६ दिवस नौदल आणि तटरक्षक दल हे हेलिकॉप्टरद्वारे साईशचा समुद्रात शोध घेत होते. अखेर आज राजभवनला लागून असलेल्या समुद्रात साईशचा मृतदेह सापडला आहे. 

missing boy's body was found during the immersion of lalbaugcha raja! | लालबाग राजाच्या विसर्जनावेळी बुडालेल्या बोटीतील मुलाचा मृतदेह सापडला!

लालबाग राजाच्या विसर्जनावेळी बुडालेल्या बोटीतील मुलाचा मृतदेह सापडला!

Next

मुंबई - प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान गिरगाव चौपाटीवर खोल समुद्रात बोट उलटून अपघात घडला होता. या  दुर्घटनेत सहा ते आठ जण पाण्यात बुडाले होते. बुडालेल्यांपैकी ५ वर्षीय साईश मर्दे हा चिमुकला सापडला नव्हता. त्यानंतर सलग ६ दिवस नौदल आणि तटरक्षक दल हे हेलिकॉप्टरद्वारे साईशचा समुद्रात शोध घेत होते. अखेर आज राजभवनला लागून असलेल्या समुद्रात साईशचा मृतदेह सापडला आहे. 

पालघर येथे राहणारा साईश हा आपल्या आई - वडिलांसोबत लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यासाठी लालबाग येथे राहणाऱ्या त्याच्या मामाकडे आला होता. विसर्जनासाठी खोल समुद्रात राजाच्या तराफ्यासह कोळी बांधवांच्या ५० च्या आसपास बोटी देखील असतात. त्यापैकी राजधानी नावाच्या बोटीतून साईश आणि त्याची बहीण आई - वडिलांसोबत लालबागच्या राजाला निरोप देण्यास गेले असता ही दुर्घटनेत घडली. या दुर्घनेत ५ वर्षीय साईशचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला.  

Lalbaugcha Raja Visarjan : बुडालेल्या एका लहानग्याचा शोध सुरू, तिघांवर नायर रुग्णालयात उपचार

Web Title: missing boy's body was found during the immersion of lalbaugcha raja!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.