मुंबई : महापालिकेच्या सार्वजनिक खात्याकडील महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी तवा रेस्टॉरन्ट, खाना खजाना, सुदामा, इमराल्ड क्लब, गोल्डन चॅरिएट हॉस्पिटॅलिटी, माचू पिचू हॉटेल, सबकुछ प्लाझा हॉटेल आणि वेस्टरिया या आठ हॉटेल्सच्या मंजुरीची कागदपत्रे गहाळ झाल्याची माहिती समोर आली आहे.राष्ट्रीय मुलभूत हक्क सुरक्षा परिषदेचे संयोजक शरद यादव यांनी माहिती अधिकारांतर्गत महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याकडे गहाळ झालेल्या अभिलेखांची (फाईल्स) विचारणा केली होती. यावरील उत्तरात महापालिकेने ‘अ’ वर्गातील गहाळ झालेल्या अभिलेखांची माहिती यादव यांना दिली आहे. शिवाय आजपर्यंत गहाळ झालेल्या परवान्यांच्या मंजुरींच्या कागदपत्रांची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात केल्याचेही प्रशासनाने उत्तरात म्हटले आहे. तसेच १९७९ सालापासून महापालिकेकडील जन्म-मृत्यूंबाबतचे अभिलेखांचे वर्गीकरण करण्यात आल्याचे प्रशासनाने उत्तरात केले आहे. (प्रतिनिधी)
महापालिकेच्या सार्वजनिक खात्यातील कागदपत्रे गहाळ
By admin | Published: April 17, 2016 1:33 AM