पुण्यात आलेल्या तरुणाची ‘मिसिंग मिस्ट्री’, १०० क्रमांकावर केला अखेरचा कॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 01:57 AM2018-03-22T01:57:50+5:302018-03-22T01:57:50+5:30

आयएएसच्या परीक्षेची तयारी करणारा तरुण १०० क्रमांकावर अखेरचा कॉल करून, पुण्यातून नॉट रिचेबल झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रिजॉय जयराजन पन्थोकुलोथू (२७) असे तरुणाचे नाव असून, तो गेल्या ४ महिन्यांपासून बेपत्ता आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांसह मुंबई पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Missing Mystery, the last person to get the 100th rank in the city of Pune | पुण्यात आलेल्या तरुणाची ‘मिसिंग मिस्ट्री’, १०० क्रमांकावर केला अखेरचा कॉल

पुण्यात आलेल्या तरुणाची ‘मिसिंग मिस्ट्री’, १०० क्रमांकावर केला अखेरचा कॉल

googlenewsNext

मुंबई : आयएएसच्या परीक्षेची तयारी करणारा तरुण १०० क्रमांकावर अखेरचा कॉल करून, पुण्यातून नॉट रिचेबल झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रिजॉय जयराजन पन्थोकुलोथू (२७) असे तरुणाचे नाव असून, तो गेल्या ४ महिन्यांपासून बेपत्ता आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांसह मुंबई पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मूळचा केरळचा रहिवासी असलेला रिजॉय हा बीएससी झाला आहे. तो लग्नानंतर पुण्यात पत्नीसोबत राहत होता. मात्र, लग्नाच्या सहा महिन्यांतच त्यांनी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला, तेव्हापासून तो तणावात होता. तो आयएएस परीक्षेची
तयारी करत होता. त्याचा भाऊ झिनॉयही पुण्यात राहतो. तो
पुण्याच्या राष्टÑीय रासायनिक प्रयोगशाळेत नोकरीला आहे.
१५ नोव्हेंबर रोजी भावाचा त्याच्यासोबत संपर्क झाला. त्याने त्याला नाश्ता करण्यासाठी
घरी बोलावले. रात्रीचे जेवण
सोबत करू, असे सांगून रिजॉयने फोन ठेवला. वडिलांचेही त्याच्यासोबत बोलणे झाले. जेवणासाठी रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने, त्याच्या भावाने बरीच शोधाशोध करून, अखेर पुण्यातील
चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
झिनॉयने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, पुणे सायबर पोलीसही याचा समांतर तपास करत
होते. त्यांच्या तपासात त्याने अंधेरीतून १०० क्रमांकावर अखेरचा कॉल
केला. तो कॉल ४० सेकंद सुरू
होता. त्यानंतर, तो नॉट रिचेबल झाला.

Web Title: Missing Mystery, the last person to get the 100th rank in the city of Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई