Join us

पुण्यात आलेल्या तरुणाची ‘मिसिंग मिस्ट्री’, १०० क्रमांकावर केला अखेरचा कॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 1:57 AM

आयएएसच्या परीक्षेची तयारी करणारा तरुण १०० क्रमांकावर अखेरचा कॉल करून, पुण्यातून नॉट रिचेबल झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रिजॉय जयराजन पन्थोकुलोथू (२७) असे तरुणाचे नाव असून, तो गेल्या ४ महिन्यांपासून बेपत्ता आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांसह मुंबई पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मुंबई : आयएएसच्या परीक्षेची तयारी करणारा तरुण १०० क्रमांकावर अखेरचा कॉल करून, पुण्यातून नॉट रिचेबल झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रिजॉय जयराजन पन्थोकुलोथू (२७) असे तरुणाचे नाव असून, तो गेल्या ४ महिन्यांपासून बेपत्ता आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांसह मुंबई पोलीस त्याचा शोध घेत आहेत.मूळचा केरळचा रहिवासी असलेला रिजॉय हा बीएससी झाला आहे. तो लग्नानंतर पुण्यात पत्नीसोबत राहत होता. मात्र, लग्नाच्या सहा महिन्यांतच त्यांनी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला, तेव्हापासून तो तणावात होता. तो आयएएस परीक्षेचीतयारी करत होता. त्याचा भाऊ झिनॉयही पुण्यात राहतो. तोपुण्याच्या राष्टÑीय रासायनिक प्रयोगशाळेत नोकरीला आहे.१५ नोव्हेंबर रोजी भावाचा त्याच्यासोबत संपर्क झाला. त्याने त्याला नाश्ता करण्यासाठीघरी बोलावले. रात्रीचे जेवणसोबत करू, असे सांगून रिजॉयने फोन ठेवला. वडिलांचेही त्याच्यासोबत बोलणे झाले. जेवणासाठी रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने, त्याच्या भावाने बरीच शोधाशोध करून, अखेर पुण्यातीलचतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.झिनॉयने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, पुणे सायबर पोलीसही याचा समांतर तपास करतहोते. त्यांच्या तपासात त्याने अंधेरीतून १०० क्रमांकावर अखेरचा कॉलकेला. तो कॉल ४० सेकंद सुरूहोता. त्यानंतर, तो नॉट रिचेबल झाला.

टॅग्स :मुंबई