मिशन महापालिका : शिवसेना आणि राष्ट्रवादीची निवडणुकांसाठी चाचपणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 10:40 AM2021-12-13T10:40:09+5:302021-12-13T10:41:25+5:30

येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्याआधीच प्रत्येक पक्षाने तयारी सुरु केली आहे. त्यात आता या आठवड्यात शिवसेना ब राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठकी ही पक्षाने आयोजित केलेल्या आहेत अशी माहिती आहे

Mission Municipal Corporation: Shiv Sena and NCP are being tested for the upcoming elections in maharashtra | मिशन महापालिका : शिवसेना आणि राष्ट्रवादीची निवडणुकांसाठी चाचपणी सुरू

मिशन महापालिका : शिवसेना आणि राष्ट्रवादीची निवडणुकांसाठी चाचपणी सुरू

Next
ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणही रद्द केलं आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दाही पेटलेलाच आहे

मुंबई : राज्यात आगामी काळात मुंबई, पुण्यासह काही महत्त्वपूर्ण शहरांमध्ये महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे. राज्यात आगामी महापालिका निवडणूक काही महिन्यांवर असून, 'मिशन महापालिके'चा भाग म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी आता चाचपणी सुरू केली आहे. महापालिकेसोबतच जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचाराचाही बिगूल ते वाजविणार आहेत.

अचानक मतदारसंघातील विकासकामे करण्यासाठी भेटीगाठी

पुणे, पिंपरी चिंचवड, बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत.त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.वॉर्डपप्रमाणे व्यूहरचना आखण्याचा सूचना राष्ट्रवादी व शिवसेना पक्षश्रेष्ठींनी पदाधिकारी व नेत्यांना दिल्या आहेत . त्याचे पडसाद आता राज्यात ज्या ठिकणी निवडणुका आहेत तिथे उमटू लागले असून, अचानक मतदारसंघातील विकासकामे करण्यासाठी पदाधिकारी व इच्छुक आता आमदारांच्या व पक्षश्रेष्टींच्या गाठीभेटी घेण्याचे प्रमाण वाढले आहे.

ग्रांउड लेव्हलचा आढावा घेतल्यानंतर पुढील कार्यक्रम

येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्याआधीच प्रत्येक पक्षाने तयारी सुरु केली आहे. त्यात आता या आठवड्यात शिवसेना ब राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठकी ही पक्षाने आयोजित केलेल्या आहेत अशी माहिती आहे.आगामी महापालिका निवडणूका स्वबळावर लढण्याची तयारी करा,  अशा सूचना शिवसेना व राष्ट्रवादीकाँग्रेस  पक्षांनी  आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना  दिल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्ते ही कामाला लागले आहेत. शिवसेना शाखाप्रमुख तसेच गटप्रमुख हे आपल्या विभागातील सर्व माहिती गोळा करत आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष देखील वॉर्डात फिरून मोर्चेबांधणी करत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्ष्यांचे ग्राउंड लेव्हल वर मोठ्या प्रमाणात काम सुरू झाले आहे.ग्राउंड लेव्हल चा आढावा घेऊन पुढे इच्छुक उमेदवारांची आणि पदाधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार वॉर्डातील उमेदवारांची चाचपणी पुढे होणार अशी माहिती देखील मिळत आहे.

प्रभागरचनेत बदल ; त्यानुसार रणनीती

मुंबई महापालिकेत 1 सदस्यीय प्रभाग रचना असणार आहे. तर इतर सर्व महापालिकेत 3 सदस्यीय प्रभार पद्धत असेल. त्याचबरोबर नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र 2 सदस्यीय, तर नगरपंचायतीला 1 सदस्यीय प्रभाग असणार आहे.असे ठाकरे सरकारने काहिदिवसांपूर्वी निर्णय घेतला.यामध्ये राज्यातील बहुतांश महापालिकांमधील भाजपचं वर्चस्व कमी करुन आपली ताकद वाढवण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत आहेत.त्यात आता नवीन प्रभाग रचनेनुसार रणनीती शिवसेना आणि राष्ट्रवादीची सुरू आहे.

फटका बसण्याआधी ; स्वतंत्र चाचपणी

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणही रद्द केलं आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दाही पेटलेलाच आहे.ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा विरोधी पक्ष असलेल्या भाजपने उचलून धरला आहे. दोन्ही मुद्यांमुळे राज्य सरकारमधील पक्षांना महापालिका निवडणूकीत फटका बसण्याची भीती आहे. तसेच महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये अनेक शहरांमध्ये एकमत नाही. स्थानिक पातळीवर एकमेकांविरोधात उभे ठाकण्याची तयारी करण्यात येत आहे. त्यामुळे याबाबी लक्षात घेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र अशी तयारी सुरू केली आहे.
 

Web Title: Mission Municipal Corporation: Shiv Sena and NCP are being tested for the upcoming elections in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.