महापालिकेचे मिशन मालमत्ता कर, साडेतीनशे कोटी रुपये तिजोरीत जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 01:48 AM2020-03-01T01:48:01+5:302020-03-01T01:48:05+5:30

मालमत्ता कर भरण्यासाठी आवाहन करूनही नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेने आता कठोर पावले उचलली आहेत.

Mission property tax of municipal corporation, deposited in the treasury of Rs | महापालिकेचे मिशन मालमत्ता कर, साडेतीनशे कोटी रुपये तिजोरीत जमा

महापालिकेचे मिशन मालमत्ता कर, साडेतीनशे कोटी रुपये तिजोरीत जमा

Next

मुंबई : मालमत्ता कर भरण्यासाठी आवाहन करूनही नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेने आता कठोर पावले उचलली आहेत. या मोहिमेअंतर्गत तीन हजार ३९२ मालमत्तांना कारवाईचा बडगा दाखविण्यात आला आहे. यापैकी एक हजार ३७६ कोटी रुपये कर थकविणाऱ्या तीन हजार १७९ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
त्यामुळे आठवड्याभरातच सुमारे साडेतीनशे कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. या कारवाईअंतर्गत जलजोडणी खंडित करण्याबरोबरच बिल्डरच्या कार्यालयातील सामान जप्त करण्यात आले आहे. अशा प्रकारची कारवाई पहिल्यांदाच होत आहे.
महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत बनलेल्या मालमत्ता करातून सुमारे १८०० कोटी येणे आहे. मात्र ही रक्मम वसूल करण्यासाठी जेमतेम महिन्याभराचा कालावधी उरला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने कर निर्धारक व संकलन खात्याला
कर वसूल करण्याचे लक्ष्य दिले आहे. त्यानुसार २६९ कोटींपेक्षा अधिक थकबाकी असणाºया २१३ मालमत्तांची जलजोडणी खंडित करण्यात आली आहे. तसेच कर भरण्यास टाळाटाळ करणाºया मे. सुमेर बिल्डरच्या ‘रे रोड’भागातील एका कार्यालयातून लॅपटॉप, संगणक, प्रिंटर, टेबल, खुर्च्या, सोफा इत्यादी जप्त करण्यासह तेथील आरएमसी प्लांट सील करण्यात आला आहे.
मोठ्या थकबाकीदारांचे घर, कार्यालय येथून विविध वस्तू जप्त करण्यात येत आहेत. भायखळा येथील ‘इ’ विभाग कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
आतापर्यंत दररोज सुमारे १० कोटी असणारी दैनंदिन वसुली या कारवाईनंतर ४० ते ५० कोटींपर्यंत पोहोचली आहे. यानुसार गेल्या आठवड्याभरातच ३५० कोटी रुपयांचा भरणा थकबाकीदारांनी महापालिकेकडे केला आहे. मात्र, अनेक थकबाकीदारांकडून अद्याप थकीत रक्कम आलेली नाही.
>थकबाकीदारांच्या घरगुती वस्तू होणार जप्त
बृहन्मुंबई महापालिका अधिनियम १८८८ च्या कलम २०३ अन्वये जलजोडणी खंडित करणे, मालमत्तेची अटकावणी करणे, मालमत्तेची जप्ती करणे यांसारखी कारवाई करण्यात येत असे. मात्र, यंदा प्रथमच याच कायद्यातील कलम २०५ व २०६ चा वापर करण्यात येत आहे.
या कलमांनुसार थकबाकीदारांच्या घरातील किंवा कार्यालयातील दुचाकी, चारचाकी, वाहने, फर्निचर, टीव्ही, फ्रीज, वातानुकूलन यंत्रणा यांसारख्या चल संपत्ती जप्त करण्यात येत आहेत. मात्र स्त्रीधन, जडजवाहिर, दागिने यांसारख्या वस्तू या कारवाईतून वगळण्यात आल्या आहेत.
>मालमत्ताधारक चार लाख ५० हजार
निवासी - एक लाख २७ हजार
व्यावसायिक ६७ हजारांपेक्षा अधिक
औद्योगिक सहा हजार
भूभाग आणि इतर १२ हजार १५६

Web Title: Mission property tax of municipal corporation, deposited in the treasury of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.