Join us

भूल यंत्राची ‘भूल’ अजूनही उतरेना

By admin | Published: August 13, 2015 2:46 AM

परदेशी बनावटीची दाखवलेली इटिंग्रेटेड अ‍ॅनेस्थेशिया मशिन (भूल देण्यासाठी वापरण्यात येणारे यंत्र) ही गुडगाव येथे तयार झाल्याचे बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाले.

मुंबई : परदेशी बनावटीची दाखवलेली इटिंग्रेटेड अ‍ॅनेस्थेशिया मशिन (भूल देण्यासाठी वापरण्यात येणारे यंत्र) ही गुडगाव येथे तयार झाल्याचे बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाले. या घोटाळ््याची चौकशी आता अतिरिक्त आयुक्त स्तरावर व्हायला हवी, अशी मागणी सदस्यांनी केली. महापालिका रुग्णालयांसाठी एकूण ५१ मशिन्सची खरेदी करण्यात आली होती. त्यापैकी फक्त २० यंत्रे परदेशी बनावटीची आहेत. उर्वरित ३१ यंत्रांची खोटी कागदपत्रे सादर केली आहेत. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश गेल्या आठवड्यात देण्यात आले होते. परंतु साहाय्यक आयुक्तांच्या पातळीवर ही चौकशी केली जाणार होती.अतिरिक्त आयुक्तांच्या पातळीवर ही चौकशी व्हायला पाहिजे. इतक्या यंत्रांची खरेदी करताना कोणत्याही गोष्टींची शहानिशा का केली गेली नाही, यावरून सदस्यांनी खंत व्यक्त केली.