Join us

विमान प्रवासात डासांचा त्रास- ट्विंक्कल खन्ना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 2:10 AM

मुंबईहून विमान प्रवास करताना आपल्याला विमानामध्ये डासांचा मोठा त्रास झाला.

मुंबई : मुंबई विमानतळावरून प्रवास करताना विमानांमध्ये आसनाखाली ठेवण्यात येणाऱ्या व आणीबाणीच्या प्रसंगी जीव वाचवणाऱ्या जीवरक्षक प्रणालीऐवजी डास पळवणाऱ्या ओडोमास ट्युबची जास्त गरज आहे, असे उपहासात्मक ट्विट अभिनेत्री टिष्ट्वंकल खन्ना यांनी केले आहे. मुंबईहून विमान प्रवास करताना आपल्याला विमानामध्ये डासांचा मोठा त्रास झाला. सकाळी विमानातून उतरेपर्यंत ७ डास मारल्याचा दावा त्यांनी टिष्ट्वटमध्ये केला आहे. टिष्ट्वंकल खन्ना यांच्या या टिष्ट्वटमुळे विमान प्रवासातील अनागोंदी व अस्वच्छ कारभारावर जणू प्रकाश पडला आहे. मात्र, विमान कोणत्या कंपनीचे होते याबाबत खन्ना यांनी टिष्ट्वटमध्ये गुप्तता पाळली आहे. डासांच्या या त्रासामुळे विमान प्रवास करताना अपघातात मृत्यू होण्यापेक्षा डेंग्यू होऊन मृत्यू होण्याची जास्त भीती आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :ट्विंकल खन्ना