मिस्त्री घेणार सर्वोच्च न्यायालयात धाव

By admin | Published: January 28, 2017 04:13 AM2017-01-28T04:13:24+5:302017-01-28T04:13:24+5:30

टाटा-सायरस मिस्त्री यांच्यातील वाद न्यायालयात पोहोचल्याने कॉर्पोरेट सेक्टरमधील सगळ्यांच्याच नजरा या प्रकरणाकडे लागून राहिल्या

Mistry will run for the Supreme Court | मिस्त्री घेणार सर्वोच्च न्यायालयात धाव

मिस्त्री घेणार सर्वोच्च न्यायालयात धाव

Next

मुंबई : टाटा-सायरस मिस्त्री यांच्यातील वाद न्यायालयात पोहोचल्याने कॉर्पोरेट सेक्टरमधील सगळ्यांच्याच नजरा या प्रकरणाकडे लागून राहिल्या आहेत. आपली बाजू मांडण्यासाठी आता टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री लवकरच सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणार आहेत.
यासाठी मिस्त्री यांनी आपल्या कारकिर्दीला पूरक ठरणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमवही केली आहे.
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरून आपली हकालपट्टी करू नये, अशी याचिका केली होती. तेव्हा एकाच आशयाच्या दोन याचिकांवरील सुनावणीस लवादाने नकार दिला. मूळ याचिकेवर आता ३१ जानेवारी रोजी सुनावणी अपेक्षित आहे. ६ फेब्रुवारी रोजी टाटा सन्सची संचालकांची अतिविशेष बैठक होणार आहे. त्या बैठकीतही सायरस मिस्त्री यांच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. सायरस मिस्त्री यांच्या कुटुंबाकडे टाटा सन्सचे १८ टक्के समभाग आहेत. या पार्श्वभूमीवर मिस्त्री हे संचालक मंडळावर राहण्याचा अधिकार असल्याचा युक्तिवाद करण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Mistry will run for the Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.