Join us

सीआयएसएफ जवानाच्या ओळखपत्राचा गैरवापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:08 AM

ओएलएक्स संकेतस्थळावरून जुन्या वस्तू विक्रीच्या नावाखाली फसवणूकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विमानतळावर कार्यरत असलेल्या एका सीआयएसएफ जवानाच्या ...

ओएलएक्स संकेतस्थळावरून जुन्या वस्तू विक्रीच्या नावाखाली फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई विमानतळावर कार्यरत असलेल्या एका सीआयएसएफ जवानाच्या ओळखपत्राचा गैरवापर करून ऑनलाइन विक्रीत फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे.

ओएलएक्स या संकेतस्थळावरून जुन्या वस्तू विक्री करण्याच्या नावाखाली ही फसवणूक होत आहे. ग्राहकाने संबंधित वस्तूंची माहिती मागवल्यानंतर त्यांना थेट या ओळखपत्राची फोटोप्रत पाठविली जाते. आपण सीआयएसएफ कर्मचारी असून, मुंबईहून अन्य ठिकाणी बदली होत असल्याने घरातील सर्व सामान विकायचे आहे, असे सांगून विश्वास जिंकला जातो. वस्तू पाठविण्याआधी ग्राहकांकडून आगाऊ रक्कम घेऊन त्यांना ठगवले जाते. उत्तर प्रदेश आणि मुंबईतील एका ग्राहकाने आपली अशा प्रकारे फसवणूक झाल्याची माहिती सीआयएसएफला दिली आहे.

सीआयएसएफ जवान श्रीकांत यांनी आपल्या ओळखपत्राचा गैरवापर होत असल्याची तक्रार पोलिसांत नोंदविली आहे. नागरिकांनी अशा प्रकारांपासून सावध राहावे, तसेच सीआयएसएफच्या नावे कोणी पैसे मागत असल्यास थेट नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

....................................................................