आयएसआय मार्कचा गैरवापर, इलेक्ट्रिक स्विचचे २६ हजार नग जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:10 AM2021-02-06T04:10:15+5:302021-02-06T04:10:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : घरगुती व तत्सम हेतूंसाठी आयएसआय मार्कवरील स्विचवरील गैरवापर रोखण्यासाठी मुंबई येथील ब्युरो ऑफ इंडियन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घरगुती व तत्सम हेतूंसाठी आयएसआय मार्कवरील स्विचवरील गैरवापर रोखण्यासाठी मुंबई येथील ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (बीआयएस) च्या पथकाने वसईतील सातिवली येथे घातलेल्या छाप्यात बीआयएस सर्टिफिकेशन मार्क (आयएसआय मार्क)चा गैरवापर करून तयार केलेले स्विचचे सुमारे २६ हजार ४० नग जप्त केले.
बीआयएस स्टँडर्ड मार्कचा गैरवापर केल्यास दोन वर्षे कारावास किंवा किमान २ लाख रुपये दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे. बनावट आयएसआय चिन्हांकित उत्पादने तयार केली जातात. मोठ्या नफ्यासाठी ग्राहकांना विकली जातात. एखाद्या उत्पादनावर आयएसआय मार्कचा गैरवापर झाल्याचे लक्षात आले तर नागरिकांनी प्रमुख, एमबीओओ -२, पश्चिम विभाग कार्यालय, बीआयएस, मनकालय, ई-९ मरोळ टेलिफोन एक्सचेंज, अंधेरी येथे कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.