मिठी उपेक्षितच; केंद्राकडून दमडीही नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 06:18 PM2020-12-17T18:18:33+5:302020-12-17T18:18:53+5:30
Mithi river News : १ हजार ६५७. ११ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती.
मुंबई : प्रत्येक पावसाळयात पाण्याखाली जाणारी मिठी आजही दुर्लक्षित आहे. कारण २६ जुलै २००५ रोजी मिठीला पूर आला. त्यानंतर केंद्र सरकारने विकास व संरक्षणासाठी मदतीची घोषणा केली. मात्र मागील १५ वर्षात मिठीला केंद्राकडून दमडीही प्राप्त झाली नाही. केंद्राकडे एकूण १ हजार ६५७. ११ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती.
एमएमआरडीए प्रशासनाकडे मिठी विकास कामे अंतर्गत एमएमआरडीए आणि पालिकेतर्फे केलेल्या विकास कामाची माहिती आणि केंद्राकडे मागणी केलेली रक्कम व आजमितीला प्राप्त रक्कमेची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी विचारली होती. एमएमआरडीए प्रशासनाने गलगली यांना कळविले की मिठी नदी विकास कामे अंतर्गत एमएमआरडीएतर्फे करण्यात आलेल्या विकास कामकरिता केंद्रांकडे मागणी केलेली रक्कम ४१७.५१ होती. तर पालिकेतर्फे केलेल्या विकास कामाकरिता १ हजार २३९.६० कोटीची मागणी केली होती. मात्र आजमितीला रक्कम प्राप्त झाली नाही.
------------------
२६ जुलै २००५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मिठी नदीला पूर आला होता.
तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी मिठीसाठी आर्थिक मदतीची घोषणाही केली होती.
राज्य सरकारने मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरणाची स्थापना केली.
मात्र आता निधीअभावी नदीची अजून दुर्दशा झाली आहे.
------------------
कोणाकडे काय
महापालिका - महापालिकेकडेकडे विहार तलाव ते सीएसटी रोड हा भाग आहे.
एमएमआरडीए - एमएमआरडीएकडे सीएसटी रोड पुलापासून माहीम कॉजवेपर्यंतचा भाग आहे.
-------------
मिठी नदीची कामे
सुशोभिकरण
रुंदीकरण
खोलीकरण
अतिक्रमण हटविणे
पर्यटन स्थळ
-------------