मिठी नदी होणार स्वच्छ! जलप्रक्रिया केंद्राचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 03:53 AM2018-03-01T03:53:13+5:302018-03-01T03:53:13+5:30

मिठी नदीतील पाणी स्वच्छ करण्यासाठी जल प्रक्रिया केंद्र उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या केंद्राद्वारे दररोज सुमारे ८० लाख लीटर पाण्यावर प्रक्रिया करून ते मिठी नदीच्या प्रवाहात सोडण्यात येईल.

 Mithi river will be clean! Last phase of the work of water treatment center | मिठी नदी होणार स्वच्छ! जलप्रक्रिया केंद्राचे काम अंतिम टप्प्यात

मिठी नदी होणार स्वच्छ! जलप्रक्रिया केंद्राचे काम अंतिम टप्प्यात

Next

मुंबई : मिठी नदीतील पाणी स्वच्छ करण्यासाठी जल प्रक्रिया केंद्र उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या केंद्राद्वारे दररोज सुमारे ८० लाख लीटर पाण्यावर प्रक्रिया करून ते मिठी नदीच्या प्रवाहात सोडण्यात येईल. तसेच मिठी नदीपात्राजवळच्या परिसरातील सांडपाणी व मल जल वाहून नेण्यासाठी सक्षम व्यवस्था तयार करण्यात येईल. जलप्रक्रिया केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आहे.
नदी स्वच्छ करण्याचे काम चार टप्प्यांत विभागले आहे. पहिल्या टप्प्यात मिठी नदीच्या उगमापासून एक हजार ६५० मीटर अंतरावर जल प्रक्रिया केंद्र उभारण्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. या सर्व प्रयत्नांमुळे मिठी नदी स्वच्छ राहण्यास मदत होईल. पहिल्या टप्प्याला आयुक्त अजय मेहता यांनी मंजुरी दिली. तर उर्वरित तीन टप्प्यांनाही तत्त्वत: मान्यता दिल्याची माहिती मुंबई मलनि:सारण प्रकल्पाचे प्रमुख अभियंता महेश ठाकूर यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात एक हजार ६५० मीटर लांबीच्या मिठी नदीमध्ये मल जल किंवा सांडपाणी जाण्यास प्रतिबंध व्हावा, यादृष्टीने फिल्टरपाडा ते डब्ल्यूएसपी कम्पाउंड या परिसरात मलनि:सारण वाहिन्यांचे जाळे सक्षम करण्यात येणार आहे.
1या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात नदीच्या उगमापासून म्हणजेच ‘फिल्टरपाडा’ परिसर ते ‘डब्ल्यूएसपी कम्पाउंड’पर्यंतच्या एक हजार ६५० मीटर लांबीच्या नदीतील पाणी स्वच्छ करण्यासाठी जल प्रक्रिया केंद्र उभारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.
2यासाठी आवश्यक असणारे प्रक्रिया केंद्र हे ‘डब्ल्यूएसपी कम्पाउंड’जवळ उभारण्यात येणार आहे. मे २०१८पासून हे केंद्र उभारण्याचे काम सुरू होणे अपेक्षित आहे. केंद्र कार्यान्वित होण्यासाठी २४ महिन्यांचा कालावधी लागेल.3या प्रक्रिया केंद्राद्वारे मिठी नदीतील ८० लाख लीटर पाण्यावर दररोज प्रक्रिया करून स्वच्छ झालेले पाणी पुन्हा नदीत सोडण्यात येणार आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली असून, निविदा प्रक्रियेत भाग घेण्याची अंतिम तारीख १६ मार्च २०१८ अशी आहे.
अशी होईल सफाई-
मिठी नदी स्वच्छ करण्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसºया टप्प्यात त्यापुढील ६ किलोमीटर लांबीच्या नदीचे काम हाती घेण्यात येईल. या अंतर्गत मल जल व सांडपाणी वाहून नेणाºया वाहिन्यांचे जाळे तसेच दोन उदंचन केंद्रे उभारण्यात येतील.
दुसºया टप्प्यातील कामासाठी १६० कोटींचा खर्च अंदाजित आहे. तर तिसºया व चौथ्या टप्प्यात नदीच्या उर्वरित भागातील जवळपास परिसरातील मल जलवाहिन्या अधिक सक्षम करणे, मल जल वाहून नेण्यासाठी ५.२ किमी लांबीचा बोगदा बांधणे आदी इत्यादी काम करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title:  Mithi river will be clean! Last phase of the work of water treatment center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.