मिठी नदी होणार प्रदूषणमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:06 AM2021-03-20T04:06:42+5:302021-03-20T04:06:42+5:30
मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील प्रस्तावित सायकल ट्रॅक आणि मिठी नदी किनारा सुशोभीकरण प्रकल्पांबाबत सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या बैठकीत ...
मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील प्रस्तावित सायकल ट्रॅक आणि मिठी नदी किनारा सुशोभीकरण प्रकल्पांबाबत सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या बैठकीत मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मुंबई मेट्रो लाईन ३ बाबतदेखील यावेळी चर्चा करण्यात आली.
मेट्रोच्या विशेषत: पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा आढावा घेण्यात आला. टनेलिंगची कामे, पूरनियंत्रण, पंपिंग स्टेशन, आदी बाबींचा ठाकरे यांनी आढावा घेतला. पश्चिम द्रुतगती महामार्गावर करावयाच्या सायकल ट्रॅकचा आढावा घेण्यात आला. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शहरात सायकल वापरास चालना देण्यास पर्यावरणपूरक आणि साहाय्यभूत ठरेल, असे ठाकरे यांनी सांगितले. मिठी नदीची स्वच्छता आणि नदीकिनाऱ्याचे सुशोभीकरण याबाबतही माहिती घेण्यात आली. मुंबई शहरातून वाहणारी ही नदी प्रदूषणमुक्त करण्याबरोबरच तिचे सुशोभीकरण करण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.