मिथुन चक्रवर्तींच्या पत्नी-मुलाला दिलासा नाही; भोजपुरी अभिनेत्रीवर बलात्कार, धमकावल्याचे आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 02:22 AM2018-07-06T02:22:46+5:302018-07-06T02:23:19+5:30
बॉलीवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची पत्नी योगिता बाली व मुलगा महाअक्षय यांच्यावर एका भोजपुरी अभिनेत्रीने बलात्कार, फसवणूक, धमकावल्याचे आरोप केले आहेत. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने या दोघांचाही अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास गुरुवारी नकार दिला.
मुंबई : बॉलीवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची पत्नी योगिता बाली व मुलगा महाअक्षय यांच्यावर एका भोजपुरी अभिनेत्रीने बलात्कार, फसवणूक, धमकावल्याचे आरोप केले आहेत. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने या दोघांचाही अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास गुरुवारी नकार दिला.
काही दिवसांपूर्वीच दिल्ली दंडाधिकाऱ्यांनी याप्रकरणी महाअक्षय व योगिता बाली यांच्यावर सकृतदर्शनी गुन्हा नोंदविला जाऊ शकतो, असे म्हटले. त्यानंतर अटकेच्या भीतीने या दोघांनीही अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठापुढे या याचिकांवर सुनावणी होती. न्यायालयाने या दोघांवरील आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने दिलासा देण्यास नकार दिला.
पीडितेच्या तक्रारीनुसार, महाअक्षयने लग्नाचे आश्वासन देत तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचा गर्भपात करण्यास भाग पाडले. महाअक्षयबरोबर असलेले नाते तोडण्यासाठी योगिता यांनी
तिला वारंवार धमक्या दिल्या.
या धमक्यांना घाबरून अभिनेत्रीने मुंबई सोडून दिल्ली गाठली.
याबाबत तिने सादर केलेल्या पुराव्यांनंतर दिल्ली दंडाधिकाºयांनी महाअक्षय व योगिता बाली यांच्यावर गुन्हा नोंदविला जाऊ शकतो, असे म्हटले होते.