‘न्यू इंडिया ॲश्यूरन्स’च्या मित्तल यांना कारावास, १६२ कोटी निधी गैरव्यवहार प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 08:15 AM2024-11-07T08:15:13+5:302024-11-07T08:15:36+5:30

Fund Misappropriation Case: विशेष सीबीआय न्यायालयाने न्यू इंडिया ॲश्यूरन्स कंपनीचे माजी महाव्यवस्थापक डॉ. आनंद मित्तल यांना १६२ कोटी निधीचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. २०१६ मध्ये हा गुन्हा दाखल केला होता.

Mittal of 'New India Assurance' jailed, 162 crore fund misappropriation case | ‘न्यू इंडिया ॲश्यूरन्स’च्या मित्तल यांना कारावास, १६२ कोटी निधी गैरव्यवहार प्रकरण

‘न्यू इंडिया ॲश्यूरन्स’च्या मित्तल यांना कारावास, १६२ कोटी निधी गैरव्यवहार प्रकरण

 मुंबई - विशेष सीबीआय न्यायालयाने न्यू इंडिया ॲश्यूरन्स कंपनीचे माजी महाव्यवस्थापक डॉ. आनंद मित्तल यांना १६२ कोटी निधीचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. २०१६ मध्ये हा गुन्हा दाखल केला होता.

सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार,  मित्तल यांची मेसर्स प्रेस्टीज ॲश्यूरन्स पीएलसी (पीए), लागोस, नायजेरिया येथे नियुक्ती करण्यात आली होती. ३ मार्च २०१० ते १२ डिसेंबर २०१४ या कालावधीत त्यांनी फर्मकडून पार्टिग गिफ्ट आणि पेन्शन या शिर्षकाखाली २ लाख ६३ हजार ४६२ डॉलर एवढी रक्कम स्वीकारली होती.

मंजूर रक्कम होती कमी
सीबीआयच्या म्हणण्यानुसार, ही रक्कम संचालक मंडळाच्या परवानगीविनाच उचलण्यात आली. २९ ऑक्टोबर २०१४ रोजीच्या बैठकीच्या इतिवृत्तांतात खूपच कमी रक्कम पेन्शन आणि पार्टिग गिफ्ट म्हणून मंजूर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. कागदपत्रे आणि पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने मित्तल यांना चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

Web Title: Mittal of 'New India Assurance' jailed, 162 crore fund misappropriation case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.