पारंपरिक झाडांपेक्षा मियावाकी झाडांचे वाढते पीक
By जयंत होवाळ | Published: March 22, 2024 09:43 PM2024-03-22T21:43:40+5:302024-03-22T21:43:53+5:30
Mumbai: मुंबईत झाडांची संख्या वाढल्याचा दावा मुंबई महापालिका करत असली तरी काही वॉर्डात पारंपरिक झाडांपेक्षा जपानी मियावाकी झाडांची संख्याच जास्त असल्याचे स्पष्ट होत आहे. मियावाकी झाडे पाच ते सहा महिन्यात वाढतात, त्यांची उंची जेमतेम चार ते पाच फूट असते.
- जयंत होवाळ
मुंबई - मुंबईत झाडांची संख्या वाढल्याचा दावा मुंबई महापालिका करत असली तरी काही वॉर्डात पारंपरिक झाडांपेक्षा जपानी मियावाकी झाडांची संख्याच जास्त असल्याचे स्पष्ट होत आहे. मियावाकी झाडे पाच ते सहा महिन्यात वाढतात, त्यांची उंची जेमतेम चार ते पाच फूट असते. त्यामुळे या झाडांची आकडेवारी जमेस धरून मुंबईत झाडे वाढल्याचा दावा कसा करता येईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या दशकभरात मुंबईत ११ लाख झाडे वाढल्याचा पालिकेचा दावा आहे. के-पूर्व भागात पालिकेने मागील पाच वर्षात २४४३ झाडे लावली. वृक्ष लागवडीचा वेग हा सरासरी पाच हजार झाडे इतका हवा होता. हा आकडा गृहीत धरला तरी २४ वॉर्डात मिळून गेल्या दशकभरात १ लाख २० हजार झाडे लावण्यात आली. असे असताना ११ लाख झाडे लावल्याचा दावा पालिका कोणत्या आधारे करत आहे, असा सवाल वॉचडॉग फाउंडेशनचे गॉडफ्रे पिमेंटो यांनी केला. वृक्ष लागवडीबाबतची माहिती त्यांनीच माहितीच्या अधिकारातून मिळवली आहे.
मुंबईत झाडांची संख्या वाढली असे असले तरी काही विभागात पारंपरिक झाडांपेक्षा जपानी पद्धतीच्या मियावादी झाडांची संख्या जास्त असल्याचे माहितीतून स्पष्ट होत आहे. या झाडांची आणि आपल्या पारंपरिक झाडांची तुलना अशक्य आहे. मियावाकी झाडांच्या आधारे एकूण झाडांची संख्या वाढली असे कसे म्हणता येईल, पारंपरिक पद्धतीची किती झाडे लावली, असा सवालही त्यांनी केला.
पुढील वॉर्डात परिपरिक झाडांपेक्षा मियावाकी झाडांची संख्या जास्त आहे
वॉर्ड पारंपरिक झाडे मियावाकी झाडे
एम १३७८ १५,६५०
एम-पश्चिम १७५५ १,२०,३८३
एम-पूर्व ४२७३ -
एल - ५९८१७
के-पूर्व २५६५ ३६२१०
पी-दक्षिण ८२०६ ९१२५
आर-सी ५१३७ ९३००
एस २८०४ २६८६०
टी ४८४८ ५२२००