मुंबई- दोन दिवसापूर्वी मुंबईत मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळावा झाला. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नक्कल करत टीका केली होती. यावरुन आरोप-प्रत्यारोपही झाले होते. खासदार संजय राऊत यांनीही यावर प्रत्युत्तर देत टीका केली होता. आता यावर आज आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आरोग्याची चेष्टा नव्हती तर...; उद्धव ठाकरेंवरील टीकेबाबत राज ठाकरेंचं स्पष्टीकरण
आज आदित्य ठाकरे यांनी फॉक्सकॉन संदर्भत पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. यावेळी आदित्य ठाकरे यांना राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर प्रश्न विचारले. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, राज ठाकरे यांच्या बाबतीत मी काही बोलणार नाही. आम्हीला दु:ख झाले. आजोबांचे खाणे पण त्यांनी काढले होते, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
आरोग्याची चेष्टा नव्हती तर...; उद्धव ठाकरेंवरील टीकेबाबत राज ठाकरेंचं स्पष्टीकरण
राज ठाकरे म्हणाले की, मी जी टीका केली ती आरोग्यावर नव्हे तर परिस्थितीवर होती. हा विषय आरोग्याचा किंवा प्रकृतीचा नाही. आता काही समस्या नाही. कुणाच्याही आरोग्याबाबत सुधारणाच व्हावी. लोकांना भेटायचं टाळत होता पण मुख्यमंत्री पदावरून उतरल्यावर भेटी सुरू झाल्या, दौरे काढले. मग तेव्हा का नाही भेटले? कित्येक लोकांना वर्षावर ताटकळत ठेवायचे. ही प्रकृतीची नव्हे परिस्थितीशी चेष्टा होती असं त्यांनी म्हटलं.
पक्षाला सत्तेत येण्यासाठी काळ जातोराष्ट्रवादी काँग्रेस निर्माण झाली तेव्हा काँग्रेसमधील १ गट उठला आणि पक्ष स्थापन केला. माझ्या पक्षाला १६-१७ वर्ष झाली. २०१४ ला भाजपाच्या हाती सत्ता आली. परंतु १९५२ मध्ये भाजपाची स्थापना झाली. प्रत्येक गोष्टीला काही काळ लागतो. शिवसेना १९६६ साली जन्माला आली. मुंबई महापालिका यायला २५ वर्ष लागली असंही राज ठाकरे म्हणाले.