Join us

"...म्हणून त्यानं कुत्रा निशाणी मागितली होती", अमोल मिटकरींचा सत्तारांवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2022 6:27 PM

NCP Amol Mitkari slams Abdul Sattar: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना दिलेल्या शिवीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अब्दुल सत्तार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ शब्दांत टीका केली. यावरून आता राष्ट्रवादी कॉंग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना मंत्री सत्तार यांची जीभ घसरली. सुळेंबद्दल प्रश्न विचारला असता सत्तार त्यांनी कॅमेरासमोरच खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केली. यावरून आता आमदार अमोल मिटकरी यांनी सत्तारांवर सडकून टीका केली आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विटच्या माध्यमातून मंत्री सत्तार यांच्यावर निशाणा साधला. "अब्दुल सत्तारच्या एका भाषणात "मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल" असा शब्दप्रयोग होता. आता महाराष्ट्राच्या जनतेने समजून घ्यावं याने कुत्रा निशाणी कशाकरिता मागितली कारण.... हा त्याच लायकीचा आहे." अशा शब्दांत मिटकरी यांनी सत्तारांची तुलना कुत्र्याशी करत सडकून टीका केली आहे. 

...नाहीतर महाराष्ट्रात फिरणे अवघड होईल अब्दुल सत्तारांचे विधान व्हायरल होताच मिटकरी यांनी ट्विट करून चांगलाच समाचार घेतला. सत्तारांना महाराष्ट्रात फिरणे अवघड होईल असा इशारा देताना मिटकरींनी म्हटले, "अब्दुल सत्तार आम्ही तुम्हाला मोठे अलंकार देऊन बोलू शकतो. मात्र आमच्या पक्षाची ती संस्कृती नाही. आदरणीय सुप्रियाताई बद्दल वापरलेले अपशब्द 24 तासाच्या आत दिलगिरी व्यक्त करून परत घ्या. नाहीतर तुम्हाला महाराष्ट्रात फिरणे अवघड होईल." अशा आशयाचे ट्विट करून मिटकरींनी सत्तारांना इशारा दिला. 

नेमकं काय घडलं? कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी पन्नास खोक्यावरुन टीका केली होती. "पन्नास खोके तुम्हाला पण मिळाले आहेत का? असा सवाल सुळे यांनी सत्तार यांना केला होता. यावर सत्तारांनी उत्तर देताना म्हटलं, ते तुम्हाला हवे आहेत का? यावर सुळे यांनी प्रतिक्रिया देताना तुमच्या पन्नास खोके आले असतील म्हणूनच तुम्ही आम्हाला ऑफर करत आहात, असं प्रत्युत्तर सुळे यांनी दिले. या प्रत्युत्तराला उत्तर देताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुळे यांनी शिवी दिल्याचे समोर आले आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मंत्री सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना शिवी दिली त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.  

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसअब्दुल सत्तारअमोल मिटकरीसुप्रिया सुळेमहाराष्ट्र