Join us

अपघात की घातपात? आमदार बच्चू कडूंनी केला मोठा खुलासा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 12:26 PM

गेल्या काही दिवसापूर्वी प्रहारचे माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. रस्ता ओलांडताना दुचाकीस्वाराने बच्चू कडू यांना धडक दिली होती.

मुंबई-  गेल्या काही दिवसापूर्वी प्रहारचे माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. रस्ता ओलांडताना दुचाकीस्वाराने बच्चू कडू यांना धडक दिली होती. या अपघातात आमदार कडू यांच्या पायाला आणि डोक्याला दुखापत झाली होती. या अपघातानंतर हा अपघात नाही तर घातपात असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चांवर आता स्वत: बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

अपघात की घातपात या चर्चांवर आमदार कडू यांनी मोठा खुलासा केला आहे. ' हा अपघात आहे, अतिशय कमी जागा होती,त्यामुळे हा अपघात झाला. यात कोणताही घातपात झालेला नाही. त्याची बाईक वेगाने नव्हती, मी टर्न झाल्यामुळे हा अपघात झाला, अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली. 

'माझी प्रतिक्रिया न घेता या चर्चा सुरू होत्या हे चुकीच होते. ज्याचा अपघात झाला त्यांना तर विचारायला हवे होते. कोणत्याही गोष्टीचे राजकारण करावे पण शहानिशा करुन करायला हवे होते, चुकीचा पायंडा पडू नये असं मला वाटते, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले. 

शिवसेनेनंतर महाविकास आघाडीसोबत युती करणार का?; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

राज्यात नेत्यांचे अपघात 

काही दिवसांपूर्वी माणचे आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाला होता. या अपघातात जखमी झालेले गोरे यांच्यावर पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले, त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर आमदार धनंजय मुंडे यांचाही अपघात झाला. त्यात मुंडे यांच्या छातीला मार लागल्याने ते देखील रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते, त्यांनाही आता रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. तर रायगडच्या कशेडी घाटात आमदार योगेश कदम यांच्या कारला डंपरने धडक दिली होती. या धडकेत कदम यांच्या वाहनाचा मागील भाग चक्काचूर झाला. सुदैवाने योगेश कदम यांना अपघातात दुखापत झाली नाही. 

टॅग्स :बच्चू कडूअपघात