जात आणि धर्म लावला तर पक्ष वाढवायला वेळ लागत नाही. सहज पक्ष वाढतो. केवळ भाषण दिल्यानं मते मिळत नाहीत, अशी टीका शिंदे गटाला पाठींबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. मनसेच्या १३ आमदारांना महाराष्ट्र आता विसरुन गेला. मी चार वेळा निवडून आलो आहे. जातीचं सोंग नाही, जातीचा झेंडा नाही, धर्माचा झेंडा नाही. तसेच कोणताही नेता बोलावला नाही, असं बच्चू कडू यावेळी म्हणाले.
बच्चू कडू यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. फक्त फेसबुकवर लाईव्हकरुन गोड गोड बोलून मतं मिळत नाही. बोल बच्चन करुन काही होत नाही. कर्म, कर्तव्य करणं गरजेचं आहे. कष्ट करावं लागते असेही कडू म्हणाले. जात आणि धर्म लावला तर पक्ष वाढवायला वेळ लागत नाही. पक्ष सहज पक्ष वाढतो, असं बच्चू कडूंनी सांगितलं. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा येथे आयोजित कार्यक्रमात बच्चू कडू बोलत होते.
ज्याला पाय नाही, हात नाही, डोळे नाहीत, ज्याला ऐकायला येत नाही, त्याचं संघटन बांधायला महाराष्ट्रभर बच्चू कडू फिरला. त्यांच्या वेदना विधानसभेत मांडल्या. ३५० गुन्हे दाखल आहेत. राज ठाकरेंवर किती गुन्हे दाखल केले? उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर गुन्हे दाखल आहेत का?, असा सवालही बच्चू कडू यांनी यावेळी उपस्थित केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"