Join us

आमदार धस यांच्याकडून पोकलेनचालक किशोरचा सत्कार अन् 51 हजारांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 6:22 PM

२४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मोठा अवाज झाला...आणि हाहाकार माजला... महाड शहरातील तारिक गार्डन इमारत पत्त्यासारखी कोसळल्याने काही काळ परिसरात धुळीचे लोट पसरले होते...

ठळक मुद्दे२४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मोठा अवाज झाला...आणि हाहाकार माजला... महाड शहरातील तारिक गार्डन इमारत पत्त्यासारखी कोसळल्याने काही काळ परिसरात धुळीचे लोट पसरले होते...विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी किशोरच्या या धाडसी आणि मदतनीस कामाचं कौतुक करत त्यास 51 हजार रुपयांची रोख मदत देऊ केली आहे.

मुंबई - तारिक गार्डन इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर शोध व बचाव पथके ढिगारा उपसून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना सोडविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करू लागले. त्यांच्या या प्रयत्नांना गती येण्यासाठी माणुसकीला महत्व देत अविरतपणे न थकता, न झोपता अखंडपणे 26 तास पोकलेन चालवण्याचं, काम किशोर लोखंडे या तरुणाने केलंय. मूळ बीड जिल्ह्यातील असलेल्या किशोरचे आमदारसुरेश धस यांनी कौतुक करत त्याचा सत्कारही केला. तसेच, त्यांच्याकडून 51 हजार रुपयांची आर्थिक मदतही धस यांनी देऊ केली आहे.  

२४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मोठा अवाज झाला...आणि हाहाकार माजला... महाड शहरातील तारिक गार्डन इमारत पत्त्यासारखी कोसळल्याने काही काळ परिसरात धुळीचे लोट पसरले होते... कानठळ्या बसणाऱ्या स्फोटाप्रमाणे आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांची धावाधाव सुरू झाली... प्रत्यक्ष घराबाहेर पडल्यानंतर कानी पडला तो फक्त...आक्रोश...काळीज धस्स करणारे दृश्य पाहून अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला आणि डोळे विस्फारून पाणावले... भेदरलेल्या नागरिकांना काही काळ काहीच सूचले नाही. डोळ्यासमोर मातीचा डोंगर पाहून मदतीसाठी धावपळ सुरू झाली. 

महाडमधील याच मदतीसाठीचा एक फोन एल अँड टी कंपनीने ठेका घेतलेल्या पोकलेन मालकाच्या कामगारालाही गेला. बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील उखंडा लिंबडेवी गावचा 24 वर्षीय किशोर सध्या महाडमध्ये पोकलँड चालविण्याचे काम करतो. 24 तारखेच्या सायंकाळी ठेकेदाराचा फोन येताच, किशोरने तत्काळ पॉकलेनला चावी देत तारिक गार्डनच्यादिशेने गिअर टाकला. घटनास्थळी पोहोचताच कामाला सुरुवात केली, तब्बल 26 तासांनंतरही त्याचं काम सुरूच होतं. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या माणसांना बाहेर काढायचंय हे एकच ध्येय त्याच्या डोळ्यासमोर आहे. किशोरने आपलं काम धैर्याने आणि जबाबदारीने पूर्ण केलं. एनडीआरएफच्या जवानांनीही किशोरच्या कामाचं कौतुक केलं होत, तर लोकमतनेही त्याचा अथक प्रश्नाची बातमी सर्वातप्रथम प्रसिद्ध केली होती.

विधानपरिषद आमदारसुरेश धस यांनी किशोरच्या या धाडसी आणि मदतनीस कामाचं कौतुक करत त्यास 51 हजार रुपयांची रोख मदत देऊ केली आहे. तसेच, राज्य सरकारने किशोरला 5 लाख रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी पुढील दोन दिवसीय अधिवेशनात करणार असल्याचेही ते म्हणाले. किशोरने 2 जणांचा जीव वाचवला असून एनडीआरएफच्या जवानांनीही त्याचे कौतुक केलंय. किशोरने महाराष्ट्र सरकारचे 10 लाख रुपये वाचवले आहेत. त्यामुळे, त्यास किमान 5 लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, असेही धस यांनी म्हटले.  

टॅग्स :आमदारसुरेश धसमहाडबीड