Join us

अमित शहांची गुप्त भेट घेतली का? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2023 3:22 PM

राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

मुंबई- राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर आले आहेत. या दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शाह यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू आहे. लवकरच जयंत पाटील अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चेवर आता जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

"अजितदादा, बऱ्याच दिवसांनी तुम्ही योग्य जागी आलात, पण..."; अमित शाहांचा स्टेजवरून 'सिक्सर'

आज सकाळपासून जयंत पाटील अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. याअगोदर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पाटील यांनी भेट घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या चर्चांना आता जयंत पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे. 

आमदार जयंत पाटील म्हणाले, मी आता या चर्चांवर रोज सकाळी येऊन स्पष्टीकरण देणार नाही. रोज नव्या बातम्या समोर येत आहेत, राज्यात रोज गैरसमज पसरवले जात आहेत. मी रात्री अनिल देशमुख, राजेश टोपे,सुनिल भुसारा आम्ही रात्री दीड वाजेपर्यंत एकत्र होतो. आज सकाळी मी शरद पवार साहेबांची भेट घेतली. या भेटीत आम्ही पक्षवाढीवर चर्चा केली. माझ्याविषयी लोकांच्या गैरसमज पसरवला जात आहे, असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं. 

"यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी अमित शाह यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबतचे वृत्त फेटाळले. पाटील म्हणाले, राजकीय वर्तुळातील कोणताही गट अशा बातम्या पेरतो असं मी म्हणणार नाही. 

माझ्यबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. अशा बातम्यांमुळे माझे मनोरंजन होत आहे. मी कोठे जाणार की नाही, याबाबत काहीच सांगितलेलं नाही. माझ्याबद्दल काही अफवा पसरवल्‍या जात आहेत.  मी माझ्या पक्षाशी एकनिष्ठ आहे, असंही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

काही जण माझ्या संदर्भात चुकीची माहिती पसरवत आहेत. मी शरद पवार यांच्‍यासाोबतच आहे.  मी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना भेटल्‍याच्‍या चर्चाही निराधार आहे, मी कुठेही गेलो तरी तुम्हाला सांगून जाईन, असंही जयंत पाटील म्हणाले.

टॅग्स :जयंत पाटीलअमित शाहराष्ट्रवादी काँग्रेस