Join us

... तर आमदार संतोष बांगर मिशी काढणार? जयंत पाटील म्हणाले, ते शब्दाला पक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2023 3:18 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार बांगर यांना टोला लगावला आहे. 

राज्यातील बाजार समितींचे निकाल जाहीर झाले. हिंगोली जिल्ह्यातील बाजार समितीचांही निकाल काल समोर आले. आमदार संतोष बांगर यांचा बालेकिल्ला असलेला कळमनुरी बाजार समितीत महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. महाविकास आघाडीने १२ जागेवर दणदणीत विजय मिळवला आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या प्रचार राज्यभर चर्चा झाली होती. आमदार बांगर यांनी या निवडणुकीवरुन चॅलेंज दिले होते. "या पॅनेलच्या १७ पैकी १७ जागा निवडून नाही आल्या तर मिशी ठेवणार नाही, असं आमदार संतोष बांगर म्हणाले होते. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार बांगर यांना टोला लगावला आहे. 

Karnataka Election: समान नागरी कायदा, गरीब कुटुंबांना मोफत दूध व गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन; कर्नाटकात भाजपचा जाहीरनामा जारी

आमदार जयंत पाटील म्हणाले, संतोष बांगर यांनी मिशी काढली का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेलेले शब्दाचे पक्के असतात. त्यामुळे ते मिशी काढतील. मिशी काढली तर बांगर यांचा आपण सत्कार करु, असा टोला जयंत पाटील यांनी बांगर यांना लगावला. 

कळमनुरी बाजार समितीसाठी भाजप, शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली. यात भाजप आणि शिवसेनेला ५ जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीने १२ जागांवर विजय मिळवला.आमदार संतोष बांगर यांचा बालेकिल्ला असलेल्या कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निकाल त्यांच्या विरोधात गेला आहे. महाविकास आघाडीने १२ जागेवर दणदणीत विजय मिळवला आहे. आमदार बांगर यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

राज्यातील बहुतांश बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. या निकालावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.      

टॅग्स :जयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेना