Jayant Patil ( Marathi News ) : मुंबई- विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session) दोन दिवसांपूर्वी संपले. शेवटच्या दिवशी सरकार आणि विरोधी गटाकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सरकारला त्यांच्या शैलित चांगलेच धारेवर धरले, राज्यातील अनेक मुद्द्यांवर बोलत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली. दरम्यान, या टीकेली विधीमंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले होतो. आमदार जयंत पाटलांच्या भाषणाची राज्यभरात जोरदार चर्चा झाली. आता खुद्द जयंत पाटलांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत समाधान व्यक्त केले आहे.
जयंत पाटील यांनी शेअर केलेला हा फोटो मुंबईतील लोकल ट्रेनमधील आहे. या फोटोत एक व्यक्ती लोकलच्या गर्दीत मोबाईलवर आमदार जयंत पाटील यांनी विधीमंडळात केलेले भाषण ऐकत असल्याचे दिसत आहे. हा फोटो पाहून आमदार पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे.
Breaking : सुजीत पाटकर व भागीदारांची १२ कोटींची संपत्ती जप्त; कोविड घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई
जयंत पाटील यांचे ट्विट काय आहे?
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मुंबईतील लोकलमधील एक फोटो शेअर केला आहे. या ट्विटमध्ये पाटील यांनी म्हटले आहे की, आज सकाळी मला हा फोटो व्हॉट्सऍप वर कोणीतरी पाठवला. गेली ३५ वर्ष मी महाराष्ट्राच्या विधानसभेत काम करत आहे. विधानसभेत भाषण झाल्यानंतर अनेकदा सर्वच बाकांवरील सहकारी बाहेर आल्यावर अभिनंदन करतात.
"मात्र माझ्या मनाला तेव्हाही फारशी स्वस्थता नसते. मात्र, जेव्हा एखादा सामान्य माणूस, महिला कुठेतरी भेटल्यावर मला जवळ येऊन म्हणतात, “तुमचे विधानसभेतील त्या दिवसाचे भाषण चांगले झाले” तेव्हा माझ्या मनाला खरा आनंद होऊन मन सुखावून जाते. आमच्या सार्वजनिक जीवनाचा खरा केंद्रबिंदू आणि भाग्यविधाता हा सामान्य नागरिकच आहे, अशी माझी ठाम धारणा आहे. आज मुंबई लोकलमध्ये एवढ्या गडबड आणि धावपळीत हे एक सदगृहस्थ माझे भाषण आवर्जून ऐकत आहेत, हे बघून मनाला समाधान वाटले, असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
विधीमंडळात शेवटच्या दिवशी जयंत पाटलांनी सरकारला घेरले
देवेंद्र फडणवीस हे फोडाफोडी करण्यात व्यस्त आहेत. त्यांना गृहखाते पाहण्यास वेळ नाही, महिला सुरक्षित नाहीत हे सांगत असताना रामाचा आदर्श सांगणारे सीता माईंचं रक्षण म्हणजेच राज्यांतल्या महिलाचं रक्षण का करत नाहीत असाही सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केला.
"राज्याच्या आर्थिक नियोजनात बेशिस्तपणा सुरू आहे, सरकारकडे असणाऱ्या पैशापेक्षा मागणी जास्त आहे. काल मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं यात शेतकऱ्यांना मदतीचं सांगितलं. म्हणजे जर मार्च आधी सरकारला ते द्यायचे असतील तर सरकारला आता १ लाख ६० हजार कोटींची गरज आहे. मार्चच्या आधी एवढ उत्पन्न वाढण्याची शक्यता नाही. सदस्यांनी मागणी करायची ती पुरवणी मागण्याच्या माध्यमातून मंजूर करायची या पद्धतीने कधीच काम पूर्ण होणार नाही. या सरकारने १ लाख कोटींची हमी घेतली आहे. हमी घेणे एवढी सोपी गोष्ट नाही. एमएमआरडी सारखी संस्था पूर्ण अडचणीत आली आहे, म्हाडासारखी संस्थाही पूर्ण अडचणीत आली आहे. राज्यातील सिंचन योजनाही अडचणीत आल्या आहेत, असंही आमदार पाटील म्हणाले.