लोकसभा निवडणुकासाठी भाजपने काल उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. रावेर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची सुन रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, आता या मतदार संघात खडसे विरुद्ध खडसे असा समाना रंगणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आता 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही हेच संकेत दिले आहेत.
जयंत पाटील यांनी रावेर लोकसभा मतदार संघातून रोहिणी खडसे देखील उमेदवार असू शकतात, असे संकेत दिले आहेत. याबाबत येत्या दोन-तीन दिवसात निर्णय होईल , असंही पाटील म्हणाले. यामुळे आता बारामतीनंतर नणंद विरुद्ध भावजय असा सामना होऊ शकतो.
शरद पवार एक जागा भाजपला सोडणार? एकनाथ खडसे, रोहिणी खडसे यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा
निलेश लंके आज शरद पवारांची भेट घेणार
आमदार निलेश लंके आज शरद पवार यांची भेट घेणार आहेत. लंके लोकांमधले नेते आहेत ते पक्षात आले तर स्वागतच आहे. सध्या आमचे जागावाटप अजून झालेले नाही.पण निलेश लंके एक चांगला चेहरा आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.
एकनाथ खडसे, रोहिणी खडसे यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा
भाजपाने रावेर लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्या भाजपात जाण्याची चर्चा सुरु होती. खुद्द रक्षा खडसे यांनीच सासऱ्यांनी भाजपात परत यावे, असे आवाहन केले होते. परंतु खडसे यांची भाजपविरोधातील वक्तव्ये पाहता रक्षा खडसे यांना भाजपा पुन्हा तिकीट देते का, असाही प्रश्न उपस्थित होत होता. परंतु आता चित्र स्पष्ट झालेले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आमदार, खासदारांचा मोठा लवाजमा सोबत नेला तरी खासदार कलाबेन डेलकर यांनी ठाकरे गटाची साथ सोडली नव्हती. परंतु त्या काहीही न जाहीर करताच पुन्हा भाजपात गेल्या आहेत. भाजपाने त्यांना उमेदवारी जाहीर करून आश्चर्याचा धक्का दिला आहे. तसाच प्रकार शरद पवारांच्या गोटात झाला आहे. पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या सुनेला उमेदवारी देऊन भाजपाने रावेर मतदारसंघात मविआसमोर पेच निर्माण केला आहे. आता भाजपविरोधात लढायचे की ती जागा कमी क्षमतेचा उमेदवार देऊन सोडायची या द्विधा मनस्थितीत शरद पवार गट असणार आहे. बारामतीत सासरा वि. सुन अशी अस्तित्वाची लढत पवारांमध्ये असली तर खडसेंच्या कुटुंबात तेवढे वैर आलेले नाहीय. राजकारणातील एक सोय म्हणून रक्षा खडसे खासदार म्हणून भाजपात राहिल्या होता. तर एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेले होते.