आ. कुचे यांची राज्यमंत्री कराड यांच्यावर मात; साडेसात कोटींच्या घरासाठी कराड वेटिंगवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 08:25 AM2023-08-15T08:25:21+5:302023-08-15T08:26:25+5:30

हे एकच घर आमदार-खासदार या वर्गवारीसाठी राखीव असल्याने राज्यमंत्री कराड यांना प्रतीक्षा यादीवर समाधान मानावे लागले. 

mla kuche defeats minister of state bhagwat karad waiting for a house worth seven and a half crores | आ. कुचे यांची राज्यमंत्री कराड यांच्यावर मात; साडेसात कोटींच्या घरासाठी कराड वेटिंगवर

आ. कुचे यांची राज्यमंत्री कराड यांच्यावर मात; साडेसात कोटींच्या घरासाठी कराड वेटिंगवर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बदनापूरचे (जि. जालना)  भाजप आमदार नारायण कुचे यांनी त्यांच्याच पक्षाचे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्यावर वेगळ्याच प्रकारे मात केली. म्हाडाच्या ताडदेव येथील एका इमारतीमधील साडेसात कोटींचे घर त्यांनी जिंकले. हे एकच घर आमदार-खासदार या वर्गवारीसाठी राखीव असल्याने राज्यमंत्री कराड यांना प्रतीक्षा यादीवर समाधान मानावे लागले. 

म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठीची सोडत आज काढण्यात आली. या घरांमध्ये अल्प, उच्च आणि उच्च उत्पन्न गटांसाठी घरे उपलब्ध होती. सर्वांत महागडी तीन घरे ताडदेव या उच्चभ्रू भागात क्रिसेंट टाॅवर या इमारतीत उपलब्ध होती. त्यातील एक घर आमदार-खासदार यांच्यासाठी राखीव होते. १४२.५० चौरस मीटर म्हणजे १५३३ चौरस फुटांच्या सुमारे ७.५८ कोटी रुपये किमतीच्या या घरासाठी राज्यमंत्री कराड आणि आ. कुचे यांनी अर्ज केला होता. आता हे घर कुचे यांनी नाकारले तरच ते कराड यांना प्रतीक्षा यादीत क्रमांक १ वर असल्याने मिळण्याची शक्यता आहे. 

आ. कुचे प्रतिनिधित्व करत असलेला बदनापूर विधानसभा मतदारसंघ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे प्रतिनिधित्व करत असलेल्या जालना लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे आणि ते त्यांचे कट्टर समर्थक मानले जातात.


 

Web Title: mla kuche defeats minister of state bhagwat karad waiting for a house worth seven and a half crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.