Join us

'आज काय होणार असेल तर....; निलेश लंकेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचे दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 11:47 AM

लोकसभा निवडणुका काही दिवसातच जाहीर होणार असून सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

Nilesh Lanke ( Marathi News ) : मुंबई-लोकसभा निवडणुका काही दिवसातच जाहीर होणार असून सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काल भाजपची दुसरी यादी जाहीर झाली, अहमदनगरमधून भाजपने सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटातील आमदार निलेश लंके लोकसभा लढवणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आज ते 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. यावर स्वत: आमदार निलेश लंके यांनी स्पष्टीकरण दिले आहे.   

राज्यात उद्यापासून आचारसंहिता?; अजित पवारांनी बारामतीतून दिले संकेत

आमदार निलेश लंके म्हणाले, माझा कोणीही विरोधक नाही, मी कामाला महत्व देणारा माणूस आहे. दुसरा कोण काय करतोय या गोष्टीकडे लक्ष देत नाही. काम करत राहतो, आम्ही अडीच वर्ष सत्तेत होतो.  मी सामाजिक काम करतो. अजित पवार आमचे नेते आहेत. लोकसभेसाठी माझं अजून काहीही ठरलेलं नाही. कार्यकरर्त्यांचा आग्रह काय आहे हे अजून मी पाहिलेलं नाही. लोकांची भावना काय आहे हे पण तपासले पाहिजे. जनतेचं मत काय आहे हे पाहणं गरजेचं आहे, राजकारणात वेळ बघून निर्णय घ्यायचे असतात, असंही आमदार निलेश लंके म्हणाले. 

"आज माझ्या नियोजनात कोणत्या पक्षात प्रवेश करायचं असं काही नाही. मतदार संघात उद्घाटन आहे. आज जर काही होण्याची चिन्ह असतील तर तुम्हाला पहिला कॉल करेन. आज पुस्तकाचं प्रकाशन आहे. कोरोना काळातील अनुभव त्यात लिहिला आहे, विकासाचा फायदा हा सर्वसामान्यांना होत असतो. विरोधक काय बोलतात यापेक्षा लोक काय बोलतात हे महत्वाचं असतं, असा टोलाही आमदार लंके यांनी खासदार सुजय विखे यांना लगावला. 

 भाजपाने अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यात आज गुरुवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नीलेश लंके हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे अहमदनगर मतदारसंघात विखे-लंके यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसभाजपाअजित पवारशरद पवार