'शकुनी मामाची चाल यशस्वी ठरली, वंचित-ठाकरे गटाची आघाडी होऊ नये ...'; नितेश राणेंचा राऊतांवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 05:35 PM2024-03-24T17:35:32+5:302024-03-24T17:38:29+5:30
Sanjay Raut Nitesh Rane : "अपेक्षेप्रमाणे शकुनी मामाने परत एकदा चाल खेळली आणि ती यशस्वीही केली. वंचित आघाडी बरोबरची युती शकुनी मामा होऊ देणार नाही हे मी पहिल्या दिवसापासून मी सांगत आलो आहे, असंही राणे म्हणाले.
Sanjay Raut Nitesh Rane ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा करुन आठवडा उलटला तरीही बहुतांश पक्षांनी उमेदवारांची घोषणा केलेली नाही. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. याबाबत जागावाटपाच्या चर्चा सुरू होत्या. तर दुसरीकडे, आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता युती राहिली नाही, अशी घोषणाच प्रकाश आंबेडकर यांनी केली. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार आरोप केले आहेत.
गोपीनाथ गडावर धनंजय मुंडेंना २००९ ची आठवण; बजरंग सोनवणेंची काढली 'ऐपत'
"अपेक्षेप्रमाणे शकुनी मामाने परत एकदा चाल खेळली आणि ती यशस्वीही केली. वंचित आघाडी बरोबरची युती शकुनी मामा होऊ देणार नाही हे मी पहिल्या दिवसापासून मी सांगत आलो आहे. वंचित आघाडी ज्या जागा कधीही जिंकू शकत नाही अशा जागा दिल्या. शकुनी मामाने परत एकदा चाल खेळली आहे. वंचित आघाडी सोबतची सुरू असलेल्या चर्चेचे दरवाजे कायमस्वरुपी बंद केले आहेत, असा आरोपही आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केला.
“प्रकाश आंबेडकरांनी एकतर्फी युती तोडली, चर्चाही केली नाही”
शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती आता राहिली आहे, असे मी म्हणणार नाही. याचे कारण म्हणजे आता वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीचा भाग होण्याच्या प्रयत्नात आहे. चार पक्षांची चर्चा सुरू आहे. आधी फक्त ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाली होती. ते आता राहिलेले नाही. मी अजूनपर्यंत बोललो नाही. पण, वंचितने महाविकास आघाडीत जायचे असेल, तर आधी आपण बसून चर्चा केली पाहिजे, असे अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला. धोरण ठरवले पाहिजे, जागा ठरवल्या पाहिजे. मग आपण तिकडे जायचे ठरवू. त्यातील काही गोष्टी पाळल्या गेल्या नाहीत. काही लोक त्यांच्याशी बोलून आले. पण काही झाले नाही. त्यामुळे आता युती नाही. आता महाविकास आघाडीसोबत जमले तरच युती, नाही तर युती नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना याप्रकरणी संजय राऊतांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
वंचित बहुजन आघाडी आणि आमचे नाते जुने आहे. एकत्र आहे, याचा आनंद महाराष्ट्रातील तमाम जनतेला झाला. ही युती करताना राजकारण कमी आणि महाराष्ट्रातील समाजकारण जास्त करावे, ही भूमिका होती. आता प्रकाश आंबेडकर यांनी एकतर्फी ही युती तुटल्याची घोषणा केली. हे दुर्दैव आहे. दोन नेत्यांमध्ये चर्चा होणे गरजेचे आहे. युती करताना चर्चा झाली. तर आपण दूर होताना सुद्धा एकत्र चर्चा झाली असती, तर ते आपल्या राज्याच्या राजकीय संस्कृतीला धरून झाले असते. पण दुर्दैवाने तसे झाले नाही.