तौक्ते वादळातील मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील आपद्‌ग्रस्तांना आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिला मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:06 AM2021-05-20T04:06:55+5:302021-05-20T04:06:55+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : तौक्ते चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील नागरिकांचेही जनजीवन विस्कळीत झाले. घरांवर झाडे ...

MLA Prakash Surve extends a helping hand to those affected by the storm in Magathane assembly constituency | तौक्ते वादळातील मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील आपद्‌ग्रस्तांना आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिला मदतीचा हात

तौक्ते वादळातील मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील आपद्‌ग्रस्तांना आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिला मदतीचा हात

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : तौक्ते चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील नागरिकांचेही जनजीवन विस्कळीत झाले. घरांवर झाडे पडून घरांचे पत्रे तुटले, तर भिंती कोसळल्यामुळे येथील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे येथील आपद्‌ग्रस्त नागरिकांना तातडीची नुकसान भरपाई म्हणून मागाठाणे विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी त्यांना दिलासा देत आर्थिक मदतीचा हात दिला.

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर उपनगरातील मागाठाणे येथील झोपडपट्टी परिसरात अनेक ठिकाणी घरांवर झाडे पडून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. एकीकडे कोरोनामुळे अनेक नागरिकांची नोकरी गेल्यामुळे त्यांच्यावर संकट आल्याने अनेक नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील केतकीपाडा, दामूनगर व येथील विविध भागातील नागरिकांना आमदार प्रकाश सुर्वे यांनी आर्थिक मदत केली.

मागाठाणे येथील आपद्‌ग्रस्त नागरिकांच्या सर्व घरांचे पंचनामे लवकर करण्यात यावेत, असे आदेश आमदार प्रकाश सुर्वे यांनी येथील तहसीलदार व तलाठी यांना दिले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व उपनगर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येईल असे आमदार प्रकाश सुर्वे यांनी सांगितले.

यावेळी विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस, प्रभाग समिती अध्यक्ष सुजाता पाटेकर, नगरसेविका रिद्धी खुरसंगे, नगरसेविका गीता सिंघण, शाखाप्रमुख कौस्तुभ म्हामणकर, सचिन केळकर, विठ्ठल नलावडे, शाखा संघटक हेमलता नायडू, डावरे, सुनील कांबळे, बबलू चांडालीया, पठाण शेख यांच्यासह सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

--------------------------------------

Web Title: MLA Prakash Surve extends a helping hand to those affected by the storm in Magathane assembly constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.