Join us

आमदार प्रकाश सुर्वे यांनी रात्री तीन तास केली पालिकेच्या विकासकामांची पाहाणी

By मनोहर कुंभेजकर | Published: January 07, 2024 1:23 PM

मागाठाणेत सुरू असलेल्या विकासकामांची चक्क येथील आमदारांनी काल रात्री तीन तास रस्त्यावर उतरून पाहाणी केली.

मुंबई-पालिकेची अनेक ठिकाणी विकास कामे सुरू आहेत.मात्र संबंधित पालिका अधिकाऱ्यांची पाठ फिरवल्यावर विशेष करून संध्याकाळी-रात्रीच्या वेळेत कंत्राटदार चालढकल करत असल्याने कामे वेळेत पूर्ण होत नाही,नागरिकांच्या देखिल त्याबात तक्रारी असतात. मागाठाणेत सुरू असलेल्या विकासकामांची चक्क येथील आमदारांनी काल रात्री तीन तास रस्त्यावर उतरून पाहाणी केली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे प्रभाग क्र.११ येथे  विविध ठिकाणी विकासकामे मागाठाणे  विधानसभा क्षेत्राचे आमदारप्रकाश सुर्वे यांच्या प्रयत्नांनी आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सुरू आहेत. या विकासकामांचा आढावा आणि पाहाणी त्यांनी स्वतः काल रात्री 8 ते 11 या वेळेत रस्त्यावर उतरून केली. तसेच ज्या कामांमध्ये काही ठिकाणी किरकोळ बदल करण्याची गरज आहे, त्याकडे जातीने लक्ष द्या, असे आदेश त्यांनी तेथील संबंधित पालिका अधिकाऱ्यांना व कंत्राटदाराना दिले.

यावेळी महिला विधानसभा संघटक मनीषा सावंत, शाखाप्रमुख सुभाष येरुणकर,अमोल विश्वासराव, कार्यालयप्रमुख सुशील दळवी सचिन कदम बंड्या कोळी,शैलेंद्र औचेकर,सुनील मेस्त्री,संतोष खांडेकर,बाळ सकपाळ, ममहिला कार्यालयप्रमुख येरुणकर, पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते. 

टॅग्स :प्रकाश सुर्वेमुंबईआमदार