प्रताप सरनाईकांनी नवस फेडला, तुळजाभवानीला ७५ तोळं सोनं अर्पण; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 03:56 PM2022-11-24T15:56:46+5:302022-11-24T16:00:45+5:30
बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आज तुळजा भवानीचे दर्शन घेतले. आज त्यांनी तुळजा भवानीला ७५ तोळं सानं अर्पण केले.
बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आज तुळजा भवानीचे दर्शन घेतले. आज त्यांनी तुळजा भवानीला ७५ तोळं सानं अर्पण केले. या सोन्याची किंमत ३७ लाख ५० हजार रुपये आहे.' आम्ही काही दिवसापूर्वी केलेला नवस पूर्ण झाल्याने आता तो फेडण्यासाठी संपूर्ण कुटुंबीय आलो असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.
राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार?; ठाकरे गटाच्या दाव्यावर शरद पवारांचं वेगळंच मत
यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. "तुळजा भवानी आमची कुलदेवता आहे. माझ्या दोन्ही मुलांच्या लग्नावेळी मी नवस केला होता. आता आम्ही दोन्ही नातवंडांचे जावळ करण्यासाठी आलो होतो. मी माझ्या मुलांसाठी नवस केला होता, तो नवस फेडण्यासाठी मी आलो. मी ज्यावेळी नवस केला होता, तेव्हा मी देवीला २१ तोळ्याचा हार आणि ५१ तोळ्यांच्या पादुका असं मी नवसामध्ये सांगितले होते. त्याप्रमाणे मी आज नवस फेडण्यासाठी आलेलो नाही. मी इकडे प्रसिद्धीसाठी आलेलो नाही. मी आज कुटुंबातील सर्वांना घेऊन आलो आहे, अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.
"कोरोनामुळे आणि आमच्यावर आलेल्या संकटामुळे आम्हाला तुळजापुरला येता आले नाही. पण, आता नातवांचे जावळ काढण्यासाठी आलो आहे. मुलांच्या लग्नाअगोदर आम्ही देवीला नवस केला होता. आज आम्ही तो नवस फेडला, असंही आमदार प्रताप सरनाईक म्हणाले.