Join us

आमदार साळवींच्या पीएची होणार चौकशी, रायगड लाचलुचपत विभागाची मालप यांना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2023 8:42 AM

Rajan Salvi: ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांची रायगड लाचलुचपत विभागामार्फत चौकशी सुरू आहे. आमदार साळवी यांचे स्वीय सहायक सुभाष मालप यांनाही मालमत्ता चौकशीबाबत रायगड लाचलुचपत विभागाने नोटीस पाठवली आहे. 

अलिबाग : ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांची रायगड लाचलुचपत विभागामार्फत चौकशी सुरू आहे. आमदार साळवी यांचे स्वीय सहायक सुभाष मालप यांनाही मालमत्ता चौकशीबाबत रायगड लाचलुचपत विभागाने नोटीस पाठवली आहे. 

गुरुवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश नोटीसद्वारे मालप यांना देण्यात आले होते. मात्र मालप हे चौकशीला गैरहजर राहिले. स्वीय सहायक यांनाही नोटीस आल्याने आमदार साळवी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

रायगड लाचलुचपत विभागाने साळवी आणि त्यांच्या कुटुंबीयांची मालमत्तेबाबत चौकशी सुरू केली आहे. २० जानेवारी रोजी आमदार साळवी यांची सहा तास अलिबाग येथे लाचलुचपत कार्यालयात चौकशी झाली होती. यावेळी साळवी यांनी चौकशीला सहकार्य केले असून, काही कागदपत्रांची मागणी विभागामार्फत केली आहे. 

ही माहिती १० फेब्रुवारीला आमदार साळवी यांना सादर करायची आहे. तत्पूर्वीच साळवी यांचे स्वीय सहायक मालप यांनाही मालमत्तेबाबत चौकशीला हजर राहण्याबाबत दोन दिवसापूर्वी नोटीस पाठवली होती.

 

टॅग्स :राजन साळवी