आमदार रवींद्र वायकरांच्या अडचणीत वाढ! ईडीने समन्स पाठवले; मंगळवारी होणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 04:07 PM2024-01-21T16:07:17+5:302024-01-21T16:09:00+5:30
ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Ravindra Waikar ( Marathi News ) :मुंबई- ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. वायकर यांना ईडीने समन्स पाठवले आहे, मंगळवारी जोगेश्वरी भूखंड प्रकरणी चौकशी होणार आहे. गेल्या काही दिवसापूर्वी ईडीने त्यांच्या निवासस्थानी धाड टाकली होती. तर काही दिवसापूर्वी चौकशीसाठी ईडीने समन्स दिले होते, पण ते त्यावेळी चौकशीसाठी गेले नव्हते आता दुसऱ्यांदा ईडीने नोटीस पाठवली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीतील तीन नेत्यांची ईडीकडून चौकशी होणार आहे. आमदार रवींद्र वायकर यांची जोगेश्वरी भूखंड प्रखरणी होणार आहे, तर बुधवारी बारामती अँग्रो प्रकरणी बुघधवारी ईडी चौकशी करणार असून गुरुवारी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची बॉडी बॅग घोटाळ्या प्रकरणी चौकशी होणार आहे.
आमदार वायकरांनी मागितली होती महिनाभराची मुदत
जोगेश्वरी येथे एका तारांकित हॉटेलच्या बांधकाम व व्यवहारात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) १७ जानेवारीला ईडी कार्यालयात हजर होण्यासाठी समन्स जारी केले होते. मात्र, वायकर ईडीच्या कार्यालयात हजर झाले नाहीत. याउलट चौकशीस हजर राहण्यासाठी त्यांनी एक महिन्याची मुदतवाढ मागितल्याची माहिती आहे. मात्र, त्यांना मुदतवाढ दिली किंवा कसे याची माहिती ईडीकडून प्राप्त झाली नाही. या प्रकरणी अलीकडेच ईडीच्या अधिकाऱ्यांनी वायकर यांचे निवासस्थान, मातोश्री क्लब तसेच त्यांच्या व्यावसायिक भागीदारांच्या निवासस्थानी अशा एकूण ७ ठिकाणी छापेमारी केली होती.
नेमकं प्रकरण काय?
आमदार रविंद्र वायकर यांच्या संबंधीत जोगेश्वरी भूखंड घोटाळ्या प्रकरणी प्रलंबित आहे, मुंबई पोलिसांनी या प्रकरमी गुन्हाही दाखल केला आहे. या आधारावरच ईडीने वायकर यांच्यावर मनी डॉन्ड्रीगचा गुन्हा दाखल केला होता. महापालिकेचे मैदान आहे त्यावर हॉटेल बनवण्याचा प्रयत्न होता, त्यामध्ये बनावट कागदपत्रे बनवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. दुसर एक प्रकरण म्हणजे अलिबाग मधील १९ बंगल्यांच्या आरोपातही वायकर यांचे नाव घेण्यात आले होते. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे बोलले जात आहे.