Join us  

'धनंजय मुंडे यांच्या राईट हॅन्डने बबन गित्तेंना अडकवलं'; रोहित पवारांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 12:56 PM

Rohit Pawar : आर्थिक देवाणघेवाणीतून बबन गित्ते यांनी सरपंच आंधळे यांच्यावर गोळीबार केल्याचा 'एफआयआर'मध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

Rohit Pawar ( Marathi News ) : दोन दिवसापूर्वी परळीतील मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा गोळीबारात मृत्यू झाला. या प्रकरणी आता पोलीस तपास सुरू आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून बबन गित्ते यांनी सरपंच आंधळे यांच्यावर गोळीबार केल्याचा 'एफआयआर'मध्ये नमूद करण्यात आले आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रकरणी आज 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. 

Sanjay Singh : "दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी कोणता गुन्हा केलाय की अटक करण्यात आली?, भाजपा उत्तर देईल का?"

"परळी हा जो भाग आहे, तिथे असणारे सामान्य लोक चांगले आहेत. पण, तिथे असणारे नेते मुंडे साहेब आणि पंकजा मुंडे यांच्याबद्दल बोलत नाही. कारण तिथे गेल्यानंतर त्यांचं खूप चालत असं नाही. त्यांचे कुठलेतरी कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत. ते परळी मतदारसंघत स्वत: चावलतात, ती व्यक्ती कोण? हे बघावं लागले. राहिला प्रश्न गीतेंचा यात खरं काय आणि खोटं काय हे बघावं लागेल. त्या भागातील धनंजय मुंडे यांचे राईट हॅन्ड आणि लेफ्ट हॅन्ड आहेत त्यांची पार्श्वभूमी आपण बघितली तर ते गोलगोल करण्यात माहिर आहेत, असा आरोपही आमदार रोहित पवार यांनी केला. 

"यामुळे आता बीडमधील पोलीस प्रशासनाने काम करण्याची गरज आहे. जोपर्यंत खऱ्या गोष्टी समोर येत नाही, तोपर्यंत धनुभाऊंनी सांगितलेल नाव हे आपल्याला खरं ठरवता येणार नाही, असंही रोहित पवार म्हणाले. हे तेच बबन गित्ते आहेत ज्यांनी भाजपने घेतलेले बुथ समोर आणले आहेत. त्याच बबन गित्ते यांना आता अडकवल्याचा प्रयत्न केल्याचं आतापर्यंत वाटतं आहे, असंही आमदार रोहित पवार म्हणाले. आता काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांची त्यांना भीती वाटत असावी, ज्यांनी लोकशाहीला पाठिंबा दिला.  त्या लोकांना आता अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाईल. बीडमधील छोट्यामोठ्या व्यायसायिकांना कशापद्धतीने त्रास दिला जातो हे तिथल्या लोकांना विचारा, असा गौप्यस्फोटही रोहित पवार यांनी केला. 

बबन गित्ते यांच्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल

परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर  शनिवारी येथील बँक कॉलनीत रात्री ८.३० वाजता गोळीबार करण्यात आला असून यात बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

ही घटना शनिवारी रात्री ८.३० सुमारास घडली. या घटनेने शनिवारी रात्री शहर हादरले होते. या प्रकरणी ग्यानबा गित्ते यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात रविवारी सकाळी शशिकांत उर्फ बबन गित्ते (रा. बँक कॉलनी) ,  मुकुंद ज्ञानेश्वर गित्ते, वाघबेट, महादेव उद्धव  गित्ते, बँक कॉलनी,  राजाभाऊ नेहरकर, पांगरी, राजेश वाघमोडे, पिंपळगाव गाढे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :रोहित पवारराष्ट्रवादी काँग्रेसधनंजय मुंडेपोलिसबीड