Join us

संरक्षण उत्पादनात देशाची प्रगती...; रोहित पवारांनी केले मोदी सरकारचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 7:49 PM

आमदार रोहित पवार यांनी एका बाजूला मोदी सरकारचे कौतुक केले.

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बुधवारी गुजरातमधील गांधीनगर येथे डिफेन्स एक्स्पो २०२२ चे उद्घाटन केले. कार्यक्रमाचा उद्देश भारताच्या संरक्षण उत्पादन क्षमतेचे प्रदर्शन करण्यावर केंद्रित आहे. या एक्स्पोतून संरक्षण पुरवठादार होण्याची भारताला मोठी संधी  आहे. सव्वा लाख कोटींचे ४०० सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एका बाजूला मोदी सरकारचे कौतुक केले आहे, तर दुसरीकडे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला आहे.

या प्रदर्शनावरुन आमदार रोहित पवार यांनी मोदी सरकारचे कौतुक केले आहे. तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. ही टीका आमदार पवार यांनी ट्विटरवरुन केली आहे. 

सिली सोल्स बार स्मृती इराणींना दिलासा, अबकारी परवान्याला आव्हान देणारी याचिका आयुक्तांनी फेटाळली

"संरक्षण उत्पादनात आपल्या देशाची प्रगती अभिमानास्पद असून संरक्षण पुरवठादार होण्याची आपल्याला मोठी संधीही  आहे.गुजरातमध्ये सुरु असलेल्या #Defence_Expo मध्ये सव्वा लाख कोटींचे ४०० सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे.गुजरातने ५५०० कोटीचे ३३ तर युपीने ५६४ कोटी गुंतवणुकीचे १३ करार केले, असं कौतुक आमदार रोहित पवार यांनी ट्विटमध्ये केले आहे. 

"परंतु महाराष्ट्रात गुंतवणुकीबाबत अद्याप एकही बातमी वाचनात आली नाही. #DEFENCE_EXPO ची कार्यक्रम पत्रिका बघितली तर UP, गुजरात, तेलंगणा, तमिळनाडू या राज्यांचे सेशन्स दिसतात, पण महाराष्ट्र कुठेही दिसत नाही. राज्यात संरक्षण उत्पादनास पोषक वातावरण व कल्याणी ग्रुप सारख्या कंपन्या आहेत, असंही ट्विटमध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे. 

"गतवर्षी उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून #Defence_Expo लखनौमध्ये घेतले, या वर्षी गुजरात विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गांधीनगरमध्ये आहे. मग २०२४ च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून का होईना पुढचा #Defence_Expo मुंबईत होण्यासाठी  प्रयत्न करायला हवेत, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रोहित पवार यांनी लगावला आहे.  

टॅग्स :रोहित पवारनरेंद्र मोदीभाजपाराष्ट्रवादी काँग्रेसएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस