'तेव्हा महिला मुख्यमंत्र्यांबाबत सूचलं नाही का?' संजय गायकवाड यांचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 10:08 PM2022-12-01T22:08:22+5:302022-12-01T22:15:39+5:30

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल एका कार्यक्रमात राज्याचा पुढचा मुख्यमंत्री पहिली महिला असणार असं वक्तव्य केले, यावरुन आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

MLA Sanjay Gaikwad criticized Uddhav Thackeray | 'तेव्हा महिला मुख्यमंत्र्यांबाबत सूचलं नाही का?' संजय गायकवाड यांचा उद्धव ठाकरेंना टोला

'तेव्हा महिला मुख्यमंत्र्यांबाबत सूचलं नाही का?' संजय गायकवाड यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Next

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल एका कार्यक्रमात राज्याचा पुढचा मुख्यमंत्री पहिली महिला असणार असं वक्तव्य केले, यावरुन आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आज शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. ' तुम्ही मुख्यमंत्रीपदावर होता तेव्हा तुम्हाला पहिल्या महिला मुख्यमंत्री संदर्भात सुचले नव्हते का? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. 

काल एका कार्यक्रमा दरम्यान, उद्धव ठाकरेंनी केलेल्या एका विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री देणार असल्याचं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे सोशल मीडियावरही जोरदार तर्कवितर्कांना उधाण आले आहे.   

Gujarat Assembly Elections: पहिल्या टप्प्यात एकूण ६० टक्के मतदान, गेल्या वेळेपेक्षा कमी व्होटिंग

यावरुन शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तुम्ही मुख्यमंत्री झाला होता तेव्हा तुम्हा महिला मुख्यमंत्र्या संदर्भात काही सुचले नव्हते का, आता तुम्हाला सुचले का महिला मुख्यमंत्र्याची आवश्यक्ता आहे, असा सवाल आमदार संजय गायकवाड यांनी केला. 

महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री?; उद्धव ठाकरेंच्या 'त्या' विधानाने रंगली चर्चा

उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही सांगितलं की मला पुन्हा मुख्यमंत्री करायचं आहे. पण मला मुख्यमंत्री करण्याची गरज नाही. पण माझ्या हक्काचा शिवशक्ती, भीमशक्ती लहुशक्तीचा एक कर्तबगार माणूस मग ती महिला असेल किंवा पुरुष असेल, आपल्याला मुख्यमंत्रिपदी बसवायचा आहे. हे स्वप्न नुसतं स्वप्न न राहता सत्यात उरवायचं असेल तर तुम्हाला सोबत येऊन वाड्या वस्त्यांमध्ये ही विचारांची मशाल घेऊन जावी लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल कोश्यारी आणि मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या विधानांचाही समाचार घेतला. उद्धव ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हेसुद्धा आता जुने आदर्श वाटू लागले आहे. मुंबईतील एक नेते मंत्री झाले आहेत. त्यांनी आजच्या गद्दारीची तुलना शिवरायांच्या आग्रातून सुटकेशी केली आहे. काय बोलणार याबाबत. छत्रपती शिवाजी महाराज कुठे, आग्रा कुठे? तिकडनं ते कसे सुटले? शिवरायांना सुटकेसाठी भाजपाने मदत केली होती का? शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं नसतं तर तुलना करणारे आज कुर्निसाद करताना दिसले असते, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

Web Title: MLA Sanjay Gaikwad criticized Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.