गेल्या काही दिवसापासून विरोधी पक्षनेते अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत.अजित पवार काही आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर आता शिंदे गटातील नेते आमदार संजय शिरसाट यांनी सूचक इशारा दिला आहे. 'येणाऱ्या दोन दिवसात अजित पवार कुठे आहेत ते कळेल असं आमदार शिरसाट म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्याहस्ते ध्वजारोहण, हुतात्म्यांना अभिवादन; PM मोदींकडूनही मराठीत शुभेच्छा
आज महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा होणार आहे, या सभेवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यावर बोलताना आमदार संजय शिरसाट म्हणाले, यापूर्वी त्या मैदानावर अनेक सभा झाल्या आहेत. पण, त्या सभा बाळासाहेब ठाकरे यांच्या झाल्या. सर्व पक्षांना एकत्रित आणून सभा घ्याव्या लागतात हे दुर्दैव आहे, असा टोला शिरसाट यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर लगावला.
"आजच्या सभेचा सर्वात जास्त अजित पवार यांना झाला असेल. आज दादांना सभेसाठी बोलावलं आहे. पण अजित पवार मनापासून सभेला नसणार आहेत. ते फक्त शरीराने सभेला असणार आहेत. अजित पवार दोन दिवसांनी कळेल कुठे आहेत, असा सूचक इशारा शिरसाट यांनी दिला.
'अजित पवार यांनी घेतलेला निर्णय कधीही बदलत नाहीत, अजितदादा यांच्या मनात पुढची घडामोड आहे. काही दिवसातच ते निर्णय घेणार आहेत, असंही संजय शिरसाट म्हणाले.
काही दिवसापूर्वी अजित पवार यांनी पुण्यातील राष्ट्रवादीचे नियोजित कार्यक्रम अचानक रद्द केले. त्यामुळे अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यानंतर अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत मी नाराज नसल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे, एका मुलाखतीमध्ये पवार यांनी मुख्यमंत्री होण्यास आवडेस अशी इच्छा व्यक्त केली होती.