ठाकरे गटाचे नेते सुनील राऊतांची आमदार नितेश राणेंवर बोचरी टीका; "ही टाकाऊ मुले..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 02:45 PM2023-11-30T14:45:24+5:302023-11-30T14:45:55+5:30

शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमान आता भाजपात आहेत. भुंकण्यासाठी त्यांना आरोप करावे लागतात असं सुनील राऊतांनी म्हटलं.

MLA Sunil Raut responded to BJP MLA Nitesh Rane's criticism | ठाकरे गटाचे नेते सुनील राऊतांची आमदार नितेश राणेंवर बोचरी टीका; "ही टाकाऊ मुले..."

ठाकरे गटाचे नेते सुनील राऊतांची आमदार नितेश राणेंवर बोचरी टीका; "ही टाकाऊ मुले..."

मुंबई - ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांच्या अटकेनंतर भाजपा आमदार नितेश राणे आणि संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांच्यात चांगलीच जुंपली आहे. नितेश राणे कोण आहेत? ज्या महाराष्ट्राच्या जनतेने ज्यांना टाकाऊ मुले म्हणून गणना केली जाते. त्यांच्याकडून प्रतिक्रिया ऐकण्याची जनतेला सवय नाही असा निशाणा आमदार सुनील राऊत यांनी नितेश राणेंच्या टीकेवर साधला आहे. 

आमदार सुनील राऊत म्हणाले की, नितेश राणे यांना एवढी किंमत देता, त्याची उंची किती आणि बोलतो किती? जर संजय राऊतांनी दत्ता दळवींची गाडी फोडण्याचा प्रयत्न केला असता तर आम्ही जाऊन पोलीस तक्रार केली असती का?, हे वाहन फोडलेले आरोपीही पोलिसांनी पकडले आहेत.जबाब मिळतील, कुणी केले का केले...? नितेश राणे, निलेश राणे यांना जास्त किंमत देण्याची गरज नाही. या राणे कुटुंबाने स्वत:चे किती बाप बदलले हे महाराष्ट्राला माहिती आहे. शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमान आता भाजपात आहेत. भुंकण्यासाठी त्यांना आरोप करावे लागतात. जेणेकरून मी भाजपात किती निष्ठावंत आहे हे दाखवावे लागते असा टोला त्यांनी लगावला. 

तसेच नितेश राणेंना पुरावा द्यायची गरज नाही. अख्ख्या देशाला, जनतेला आणि राज्याला माहिती आहे उद्धव ठाकरेंना काय आजार होता आणि ते त्यातून कसे बाहेर पडले. नितेश राणे आमच्याकडे पुरावे मागणारे कोण? ज्यांनी १० पक्ष बदलले, बाप बदलले अशा माणसांकडून दत्ता दळवींसारख्या निष्ठावंताची बदनामी आम्हाला मान्य नाही. ज्यावेळी नारायण फुटले तेव्हापासून आजपर्यंत ते शिवसेनेतच आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत ते शिवसेनेत राहतील असंही सुनील राऊत म्हणाले. 

एकनाथ शिंदेंवरही बरसले 
स्वत:ला हिंदुहृदयसम्राट म्हणवून घ्यायला एकनाथ शिंदेंनी असे काय केले? या देशातच एकच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, बाकी सगळे पुचाट आहे. प्रशासन संपूर्णपणे सरकारच्या दबावापुढे झुकले आहे.त्यातूनच काम सुरू आहे. त्यामुळे दत्ता दळवींना जामीन मिळण्यास दिरंगाई होतेय. येणारा काळ हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आहे. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्या सर्वांना डोक्यात आम्ही फीट करून ठेवलंय. ज्यादिवशी आमचे सरकार येईल त्यादिवशी हे सगळे जेलमध्ये असतील असा इशारा आमदार सुनील राऊत यांनी दिला. 
 

Web Title: MLA Sunil Raut responded to BJP MLA Nitesh Rane's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.