Join us

महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डचे अध्यक्ष एम.एम.शेख यांच्याविरुद्ध चार सदस्यांनी मांडला अविश्वास ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 5:14 AM

महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डचे अध्यक्ष एम.एम.शेख यांच्याविरुद्ध बोर्डाच्या चार सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. अल्पसंख्याक विभागाच्या अधिका-यांनी ही माहिती दिली.

मुंबई : महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डचे अध्यक्ष एम.एम.शेख यांच्याविरुद्ध बोर्डाच्या चार सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. अल्पसंख्याक विभागाच्या अधिका-यांनी ही माहिती दिली.शेख यांची बोर्डच्या अध्यक्षपदी आॅगस्ट २०१६ मध्ये निवड करण्यात आली होती. तेव्हा बोर्डचे सात सदस्य होते. त्यापैकी चार जणांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वास आणला आहे. शेख हे औरंगाबादचे असून काँग्रेसचे माजी विधान परिषद सदस्य आहेत. आघाडी सरकार असताना शेख यांची बोर्डच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली होती आणि भाजपाचे सरकार सत्तेत आल्यानंतर झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते विजयी झाले होते.त्यांच्याविरुद्ध बोर्डच्या चार सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावात शेख हे बोर्डच्या नियमित बैठकी घेत नाहीत. त्यांना नियमांचे ज्ञान नाही आदी आरोप झाले़