एमएमसीची वेबसाईट झाली होती हॅक; टाकण्यात आले होते अश्लील फोटो

By संतोष आंधळे | Published: October 10, 2022 10:33 PM2022-10-10T22:33:11+5:302022-10-10T22:33:59+5:30

राज्यात वैद्यकीय वर्तुळात एमएमसी या संस्थेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोरोना काळानंतर अनेक गोष्टी या ऑनलाइन झाल्या आहेत.

MMC's website was hacked; Obscene pictures were posted | एमएमसीची वेबसाईट झाली होती हॅक; टाकण्यात आले होते अश्लील फोटो

एमएमसीची वेबसाईट झाली होती हॅक; टाकण्यात आले होते अश्लील फोटो

googlenewsNext

मुंबई : महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (एमएमसी) ही राज्यातील डॉक्टरांचे परवाने नूतनीकरण करणारी वेबसाईट हॅक करून त्यावरून अश्लील चित्र टाकण्यात आल्याचा प्रकार रविवारी घडला. या प्रकरणाची माहिती मिळताच कौन्सिल प्रशासनाने याची तत्काळ दखल घेऊन कॉम्पुटर इंजिनिअरला बोलावून सर्व चौकशी करून ती समस्या दूर करण्याचे प्रयत्न सुरू होते.

राज्यात वैद्यकीय वर्तुळात एमएमसी या संस्थेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोरोना काळानंतर अनेक गोष्टी या ऑनलाइन झाल्या आहेत. त्यामुळे दर पाच वर्षांनी डॉक्टरांना त्यांचा परवाना नूतनीकरण करावा लागतो तो या वेबसाइटमार्फ़तच करावा लागतो. त्यांना नूतनीकरणाशिवाय राज्यात प्रॅक्टिस करता येत नाही. त्याचप्रमाणे ज्या काही राज्यात वैद्यकीय परिषदांचे आयोजन केले जाते, त्याची परवानगीसुद्धा या वेबसाईटला अर्ज केल्यानंतरच मिळत असते. त्यामुळे डॉक्टरांशी या वेबसाईटचा संबंध येत असतो. त्याशिवाय रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामधील न्यायवैद्यक प्रकरणाची अनेक माहिती या वेबसाइटवरून प्रकाशित होत असते.

विशेष महत्त्व असणारी ही वेबसाईट हॅक झाल्याची माहिती मिळताच त्याची वैद्यकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली. ८० हजारांपेक्षा अधिक डॉक्टर या संस्थेचे सभासद आहेत. मात्र, तोपर्यंतच्या एम एम सी या संस्थेने याची दखल घेऊन साईट पूर्ववत करण्यासाठीचे प्रयत्न चालू केले होते. सुदैवाने वेबसाईटवरील कोणतीही माहिती चोरली गेली नसल्याचे समजते.

याप्रकरणी, एमएमसीचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. सध्या वेबसाइट पूर्ववत करण्यात आली आहे. या प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार करण्याबाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
 

Web Title: MMC's website was hacked; Obscene pictures were posted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.